Sarpanch Murder Case: मस्साजोगचे ग्रामस्थ बसले अन्नत्याग उपोषणाला; ग्रामस्थांची आरोपी कृष्णा आंधळेच्या अटकेची मागणी

Massajog Village Protest: मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला ७७ दिवस उलटले तरी मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात संतप्त ग्रामस्थ अन्नत्याग उपोषणाला बसले असून, आरोपींना अटक करून तातडीने न्याय द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.
Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Murder CaseAgrowon
Published on
Updated on

Beed News: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी मंगळवारपासून (ता.२५) अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला ७७ दिवस उलटून गेले. परंतु अद्यापही या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. त्यामुळे सरपंच देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना अटक करावी. तसेच आरोपींना शिक्षा देऊन देशमुख कुटुंबाला न्याय द्यावा, या मागणीसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सकाळी १० वाजता ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे.

अन्नत्याग उपोषणाच्या आधी पोलिस अधीक्षकांसोबत झालेल्या चर्चेत काही अनपेक्षित बाबी उघड झाल्या आहेत, असं धनंजय देशमुख यांनी सांगितलं आहे. देशमुख म्हणाले, "पोलीस आरोपींना अभय देत आहेत. पोलीस एसपीच्या कानावर तपास काय झाला, ते घालत नाहीत. तसेच पोलिसांनी केलेला तपास असमानधारक आहे." असंही धनंजय देशमुख म्हणाले. 

Santosh Deshmukh Murder Case
Beed Sarpanch Murder : बीड सरपंच हत्या प्रकरण तापले; धनंजय मुंडे राजीनाम्याची मागणी

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासाबद्दल पोलिसांच्या कार्यशैलीवर संशय व्यक्त केला जात आहे. देशमुख कुटुंबाने देखील पोलिस कात तपास करत आहेत, याबद्दलची माहिती देत नसल्याचा आरोप केला होता. तसेच पोलिसांनी आरोपींना मदत केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. अद्यपाही पोलिस निरीक्षकांसोबत केलेली चर्चा असमाधानकार असल्याचं धनंजय देशमुख म्हणाले.

Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Murder Case : डाग पुसणार की आणखी गडद होणार?

ग्रामस्थांच्या मागण्या काय? 

- फरार आरोपी कृष्णा आंधळे याला अटक झाली पाहिजे. 

- कृष्णा आंधळेचे समर्थक स्टेटस ठेवत आहेत. त्याच्या कृतीचं समर्थन करत आहेत. तसेच प्राणघातक हल्ला करत आहेत. त्यामुळे समर्थकांना अटक झाली पाहिजे.

- सरकारी वकिलांची नियुक्ती करावी.

- प्रकरण फास्टट्रक न्यायालयात अंडरट्रायल चालवावं. 

वरील प्रमुख मागण्या मस्साजोग ग्रामस्थ करत आहेत.

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वेळोवेळी मस्साजोग ग्रामस्थांनी उपोषण, आंदोलन केली आहेत. देशमुख यांच्या हत्याप्रकरणी पहिल्या दिवशीच गुन्हा दाखल करण्यासाठी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. गुन्हा दाखल केल्यानंतर वाल्मिक कराडच्या अटकेसाठी रस्त्यावर उतरले होते. तसेच कराडवर मक्कोका लावण्यात यावा या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. आता धनंजय देशमुख यांच्यासोबत अन्नत्याग उपोषणाला ग्रामस्थ बसले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com