Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरण; वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Beed Walmik Karad : कराडला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुणावण्यात आली होती. पोलीस कोठडी बुधवार (ता.२२) संपल्याने कराडला बीड न्यायालयात हजर करण्यात आले.
Walmik Karad
Walmik KaradAgrowon
Published on
Updated on

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड न्यायालयाने आरोपी वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वाल्मिक कराडवर यापूर्वी मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये कराडला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुणावण्यात आली होती. पोलीस कोठडी बुधवार (ता.२२) संपल्याने कराडला बीड न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणासह खंडणी प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण झाल्याची माहिती सीआयडीने न्यायालयासमोर सादर केली. त्यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. कराडला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीड न्यायालयात हजर करण्यात आले होते.

वाल्मिक कराड ३१ डिसेंबरला पुणे सीआयडीच्या कार्यालयात शरणागती पत्कारली होती. तेव्हापासून वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात आहे. वाल्मिक कराड याच्या समर्थकांनी मध्यंतरीच्या काळात त्याच्या सुटकेसाठी परळी आणि आष्टी परिसरात निदर्शने केली होती. यावर परळी आणि बीडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

यापूर्वी खंडणीच्या गुन्ह्यातही वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्यानंतर आता संतोष देशमुख हत्याप्रकरणातही कराडला न्यायालयीन कोठडी सुणावण्यात आली आहे. कराडला मोक्का लागल्याने त्याला जामीन मिळणे अवघड असल्याचे मानले जात आहे.

Walmik Karad
Walmik Karad Harvester Scam : वाल्मिक कराडचा ऊस तोडणी यंत्राचा कथित घोटळा; मंत्री मुंडेंवरही गंभीर आरोप

तगडा पोलीस बंदोबस्त

वाल्मिक कराडला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात केलं असलं, तरी न्यायालयाच्या आवारात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यापूर्वी वाल्मिक कराडला न्यायालयात हजर केलेल्या दिवशी मोठा गोंधळ झाला होता. यामुळं पुन्हा असा काही प्रकार घडू नये म्हणून सुरक्षेच्यादृष्टीने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com