Veterinary Hospitals
Veterinary HospitalsAgrowon

Veterinary Hospitals: राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती

New Infrastructure: राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना नवीन इमारती मिळणार आहेत. तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून इमारत बांधकामासह दवाखान्याची दुरुस्ती, स्वच्छतागृह व उपकरण खरेदी यासाठी ४५८ कोटी ४१ लाख ३४ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
Published on

Mumbai News: राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना नवीन इमारती मिळणार आहेत. तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून इमारत बांधकामासह दवाखान्याची दुरुस्ती, स्वच्छतागृह व उपकरण खरेदी यासाठी ४५८ कोटी ४१ लाख ३४ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पर्यावरण व पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयामुळे राज्याच्या सात महसुली विभागातील ३४ जिल्ह्यांतील दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहेत.

Veterinary Hospitals
Veterinary Hospitals: पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या दुपटीने वाढणार

नवीन इमारत बांधण्याकरिता २८७ कोटी ७६ लाख ४४ हजार, तर दुरुस्तीसाठी १२१ कोटी ११ लाख ८२ हजार, स्वच्छतागृहासाठी २५ कोटी १७ लाख २० हजार, विविध उपकरणे खरेदीसाठी २४ कोटी ३५ लाख ८८ हजार असा एकूण ४५८ कोटी ४१ लाख ३४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षांत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ही सर्व कामे प्रस्तावित करण्यात येणार आहेत.

Veterinary Hospitals
Veterinary Services : पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या कामाची ॲपद्वारे नोंद

या ठिकाणी मिळणार नवीन इमारती

राज्यात ज्या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहेत. त्यांची विभागनिहाय संख्या पुढीलप्रमाणे :

मुंबई विभाग : ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३,

पुणे विभाग : पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात १२५,

नाशिक विभाग : नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यात ५५,

छत्रपती संभाजीनगर विभाग : छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड जिल्ह्यात ५१,

लातूर विभाग : लातूर, नांदेड, धाराशिव, हिंगोली जिल्ह्यात ३९,

अमरावती विभाग : अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात ३८,

नागपूर विभाग : नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात ३६ अशा एकूण ३२७ ठिकाणी नवीन इमारतीसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com