Maharashtra Cattle Breeds: पावसाळी प्रदेश, भातशेतीसाठी डांगी गोवंश

Characteristics of Dangi cattle: महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यादरम्यान डांग पर्वतरांग आहे. नाशिकच्या पश्चिम घाट हा भरपूर पाऊस आणि भात लागवडीसाठी खास प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर डांग टेकड्यांवरून नामाभिधान झालेला स्थानिक डांगी गोवंशासाठी देखील हा भूप्रदेश परिचित आहे.
Dangi Cow
Dangi CowAgrowon
Published on
Updated on

डॉ. प्रवीण बनकर

Maharashtra Agriculture: महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यादरम्यान डांग पर्वतरांग आहे. नाशिकच्या पश्चिम घाट हा भरपूर पाऊस आणि भात लागवडीसाठी खास प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर डांग टेकड्यांवरून नामाभिधान झालेला स्थानिक डांगी गोवंशासाठी देखील हा भूप्रदेश परिचित आहे. पर्जन्यमान अधिक असल्याने भातशेती मोठ्या प्रमाणात आहे.

भातशेतीच्या कामानुरूप स्थानिक डांगी गोवंशाला विशेष गुणधर्म आहेत. भातलावणीसाठी चिखलणीसाठी डांगी गोवंश उपयुक्त असून अहिल्यानगर (अकोले तालुका), नाशिक (इगतपुरी, सिन्नर तालुका) आणि ठाणे (शहापूर, मुरबाड) जिल्हा हे डांगीचे मुख्य पैदासक्षेत्र आहे.

Dangi Cow
Indigenous Cattle: शाश्‍वत शेती, आरोग्याचा कणा : देशी गोवंश

कैकाडी, महादेव कोळी, ठाकर समाजाचे लोक डांगीपालक जमाती म्हणून ओळखले जातात. डांगीचे कळप स्थलांतर करणाऱ्या या जमाती जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत आपल्या गावापासून दूर राहतात. उन्हाळ्यात ते कोकण भागात स्थलांतर करतात. ज्या ठिकाणी पुरेसे गवत, चारा पाणी मिळेल.

जास्त पावसाच्या काळात थंडी वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी स्थायिक होतात.आज अनेक तरुण मंडळी डांगी गोवंश पालनाकडे वळत असून डांगी संवर्धनासाठी प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत इगतपुरी (जि.नाशिक) येथे डांगी गोवंश संवर्धन प्रक्षेत्र आहे.

Dangi Cow
Devni Cattle : रुबाबदार देवणी गोवंश

वैशिष्टे

सुमारे १२५ वर्षांपूर्वीच्या ब्रिटिशकालीन दस्तावेजावरून डांगी गोवंश नाशिक, इगतपुरी या भागात बहाळा म्हणून प्रसिद्ध असल्याचे आणि गुजरात भागातून नाशिक प्रदेशात देवाणघेवाण झाल्याचे दिसून येते.

डांगी गोवंश म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर पांढऱ्या रंगावर काळ्या रंगाचे ठिपके असलेला गोवंश आठवतो. आकाराने मध्यम असलेला डांगी गोवंश क्वचित पांढऱ्याशुभ्र रंगाचा आढळतो, त्यांना पारा म्हटले जाते. तर कधी बहाळा म्हणजे पांढऱ्या रंगावर लाल किंवा काळ्या रंगाचे ठिपके शरीरभर लहानमोठे आकार पसरलेले दिसतात.

त्यावरून त्यांना लाल बहाळा, काळा बहाळा, पांढरा बहाळा अशा विविध नावांनी देखील ओळखले जाते. काळ्या रंगाचे प्रमाण अधिक असल्यास त्यास काळा मोगरा किंवा मानेरी म्हटले जाते. डांगी गोवंशाच्या सहा उपजाती संबंधित पैदास क्षेत्रात आढळून येतात. बहाळा ही डांगीची एक उपजात असल्याचे शतकापूर्वीच्या दाखल्यावरून पुष्टी मिळते.

कान आतल्या बाजूने वळलेले, काळ्या रंगांचे असल्याने ‘कानदडी’ नावाने लोकप्रिय असलेला हा गोवंश कानडा, कोकणी, घाटी नावाने देखील ओळखला जातो. लहानसे किंचित फुगीर डोके, लहान जाडजूड शिंगे, छोटे कान, लोंबते वशिंड, सरळ पाठ, काळ्या रंगाची टणक खुरे डांगी गोवंशास सुबकता आणतात. कातडीतून तेलकट स्त्राव पाझरत असल्याने डांगी गोवंशाचे जोरदार पावसापासून नैसर्गिक संरक्षण होते.

ही गाय एका वेतात सरासरी ६००-१००० लिटर दूध देते. डांगी गोवंशाचा उपयोग दुधापेक्षा शेतीकाम

आणि जंगलातील लाकूडफाटा वाहून नेण्यासाठी होतो. देखण्या डांगी बैलजोडीस बाजारात विशेष मागणी असते.

- डॉ प्रवीण बनकर, ९९६०९८६४२९,

(सहयोगी प्राध्यापक, स्ना.प.प.संस्था, अकोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com