Pune News: ‘‘देशात आणि राज्यात कृषी क्षेत्राच्या विकासाला प्रचंड क्षमता आहे. कृषी क्षेत्रात शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाला वाव देऊन अनेक संधीचा लाभ देता येऊ शकतो. सध्या जगामध्ये जागतिक हवामान बदलासह शेतीसमोर अनेक आव्हाने असून त्यामुळे कृषी मालाचा पुरवठा कमी होऊ शकतो.
निविष्ठा खर्चामुळे शेतकऱ्यांना पुरेसे उत्पन्न मिळत नाही. यावर मात करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्यावर भर देण्याची गरज आहे. यासाठी आगामी अर्थसंकल्पात भरीव मदत करण्यात येईल,’’ अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित कृषी प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमात रविवारी (ता. २६) अजित पवार बोलत होते. या वेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार यशवंत माने, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, उपविभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व बाजार समितीचे मार्गदर्शक अप्पासाहेब जगदाळे, सभापती तुषार जाधव, उपसभापती मनोहर ढुके उपस्थित होते.
या वेळी पवार म्हणाले, ‘‘शेतकरी संशोधक असला पाहिजे, शेतीत प्रगती साधण्याच्या दृष्टिने शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे. प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होते.
त्यादृष्टिने नवीन माहिती, तंत्रज्ञान याबरोबरच जातिवंत जनावरांची ओळख इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती करत आहे ही समाधानाची बाब आहे. या बाजार समितीला शेतकरी निवास उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
’’ अजित पवार म्हणाले, ‘‘इंदापूर तालुक्यातील शेतकरी डाळिंब, केळी, पेरू, द्राक्षे, ड्रॅगन फ्रूट आदी फळबागांत अग्रेसर आहे. येथील शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे द्राक्षांचे वाण तयार केले आहेत. हे पाहता शेतकऱ्याने शास्त्रज्ञांसारखा विचार केला पाहिजे. शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरले पाहिजे. शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, याबाबतचे ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले पाहिजे.’’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.