Agriculture Ai: शेतीमध्ये ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ वाढीसाठी दोन्ही पवार आग्रही

Agriculture Technology: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील राजकीय मतभेद सर्वश्रृत आहेत. परंतु, राज्याच्या ऊसशेतीसह कृषी व्यवस्थेत ‘कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी दोघेही जण कमालीचे आग्रही आहेत.
At the meeting of Vasantdada Sugar Institute
At the meeting of Vasantdada Sugar InstituteAgrowon
Published on
Updated on

Pune News: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील राजकीय मतभेद सर्वश्रृत आहेत. परंतु, राज्याच्या ऊसशेतीसह कृषी व्यवस्थेत ‘कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी दोघेही जण कमालीचे आग्रही आहेत. त्याचा प्रत्यय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वार्षिक सर्वसाधारण सभेत गुरुवारी (ता. २३) दिसून आला.

ऑक्सफर्ड विद्यापीठ, मायक्रोसॉफ्ट व ॲग्रीपायलट एआय या जागतिक कीर्तीच्या कंपन्यांच्या मदतीने बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने राज्याच्या शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू केला आहे. त्यासाठी बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या आवारात ‘मा. शरदचंद्र पवार आधुनिक शेती विस्तार संशोधन प्रकल्प’ राबवला जात आहे.

At the meeting of Vasantdada Sugar Institute
Agriculture AI : ‘एआय’द्वारे घडेल सदाहरित कृषिक्रांती

‘एआय’च्या माध्यमातून साकारत असलेल्या शेतीची उत्कृष्ट प्रात्यक्षिके अलीकडेच बारामतीच्या ‘कृषिक’ प्रदर्शनात सादर करण्यात आली. तोच धागा पकडून उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी ‘व्हीएसआय’च्या सभेत ‘एआय’ तंत्राचे जोरदार समर्थन केले. या वेळी व्यासपीठावर व्हीएसआयचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह साखर उद्योगातील मान्यवर उपस्थित होते.

‘बारामतीत जाऊन एआय तंत्र बघा’

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘‘राज्याच्या शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा वापर वाढला पाहिजे. त्यासाठी मी स्वतः राज्याचे कृषिमंत्री कोकाटे यांच्यासह बारामतीमधील ‘एआय’ तंत्रावर आधारित शेतीची माहिती घेतली. हे तंत्र कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त पाहावे व त्याचा प्रसार होण्यासाठी प्रयत्न करावा, असा माझा आग्रह आहे.

At the meeting of Vasantdada Sugar Institute
Agriculture Ai : ‘एआय’ तंत्रज्ञानाने ऊस शेतीमध्ये क्रांतिकारक बदल

त्याकरिता कृषी सचिवांनाही बारामतीमध्ये जाण्यास सांगितले आहे. शेतकऱ्यांना आता तंत्राची गरज आहे. सरकारी योजनेतून जुनी उत्पादने देण्यासाठी आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान व उत्पादने देण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. साखर कारखान्यांनीदेखील बारामतीला जाऊन एआय तंत्रज्ञान बघायला हवे. या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तुम्हाला जावेच लागणार आहे. त्यामुळे ते समजावून घ्या आणि त्याचा प्रसार करा.’’

तर, व्हीएसआयचे अध्यक्ष श्री. शरद पवार यांनी आपल्या भाषणातून साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींसमोर ‘एआय’चे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, की ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे.

त्यामुळे व्हीएसआयमध्ये या तंत्राचा स्वतंत्र विभाग स्थापन करण्याचे नियोजन आहे. सध्या बारामती येथे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर संशोधन सुरू असून या प्रकल्पाचा लाभ शेतकऱ्यांना होतो आहे. या तंत्राचा वापर साखर कारखान्यांमधील विविध टप्प्यांमध्ये केला जाऊ शकतो. त्याआधारे यंत्रणा व प्रक्रिया नियंत्रित केल्या जाऊ शकतात.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com