
Chh. Sambhajinagar News : तंत्रज्ञान हे कोणासाठी थांबत नाही, त्यात सतत बदल होत असतात, त्यासाठी आपल्याला सतत अद्ययावत राहावे लागणार आहे. भविष्यात शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता ही महत्त्वाची भूमिका बजावणार असल्यामुळे विद्यार्थी, शास्त्रज्ञ व शेतकरी यांनी नेहमीच त्यासाठी सज्ज राहावे, असे मत अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठामधील ॲग्रिकल्चर अँड बायो इंजीनीअरिंगचे प्रा. डॉ. धर्मेद्र सारस्वत यांनी व्यक्त केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू, डॉ. इंद्र मणी मिश्रा व संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषी) डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (ता. २४) कृषी महाविद्यालय, लिहाखेडी, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प छत्रपती संभाजीनगर येथे डॉ. सारस्वत यांचे कृषी महाविद्यालय, लिहाखेडीचे विद्यार्थी व प्राध्यापक, शास्त्रज्ञ, अधिकारी यांच्याकरिता ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीत वापर’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रा. सारस्वत म्हणाले, की विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. मनामध्ये कोणताही न्यूनगंड ठेवू नये. सर्व विद्यार्थी समान असतात. पायाभूत सोयीपेक्षाही शिक्षण कशाप्रकारे दिले जाते हे खूप महत्त्वाचे आहे. शिक्षण हे व्यवसायाभिमुख असले पाहिजे व त्यात प्रात्यक्षिकाची जोड असणे आवश्यक आहे.
परदेशातील कृषी क्षेत्राशी निगडित रोजगारांच्या संधी याबद्दलही त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. शेतीतील उत्पादकता वाढविण्यासाठी डाटा विश्लेषण, स्वंयचलित यंत्रणा आणि अचूक निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा कसा वापर करता येईल यावर मार्गदर्शन केले. या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे श्रम कमी करण्याबरोबरच आर्थिक बचत कशी होऊ शकते हे त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्तविकामध्ये राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक संशोधन व महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठता तथा प्राचार्य डॉ. सूर्यकांत पवार यांनी संशोधन केंद्रातून प्रसारित झालेल्या जैवसंपृक्त बाजरी वाणांचे महत्त्व विषद केले. तसेच या संशोधन केंद्रात कार्यान्विय असलेल्या जैविक औषधी व खते संशोधन व निर्मिती प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या जैविक औषधी व खते यांचा विविध पिकांसाठी शेतकऱ्यांना होणारा उपयोगाबद्दल माहिती दिली.
या वेळी कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडीत मुंढे, कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक डॉ. डी. सी. पाटगावकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, छ. संभाजीनगर कार्यालयातील शास्त्रज्ञ डॉ. डी. जी. हिंगोले, डॉ. सी. बी. पाटील, डॉ. एन. आर. पतंगे, डॉ. एस. बी. कदम यांचीही या वेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष बागडे व आभार डॉ. संतोष ढगे यांनी मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.