Agriculture Technology Festival : सगरोळीत तीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सव

Agriculture News : सगरोळी (ता. बिलोली) येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे तीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन बुधवार (ता. २९) ते शुक्रवार (ता. ३१) या कालावधीत केले आहे.
Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon
Published on
Updated on

Nanded News : सगरोळी (ता. बिलोली) येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे तीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन बुधवार (ता. २९) ते शुक्रवार (ता. ३१) या कालावधीत केले आहे.

पहिल्या दिवशी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा, संस्कृती संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमुख प्रमोद देशमुख, खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार रवींद्र चव्हाण, आमदार जितेश अंतापुरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे संचालक डॉ. सुब्रतकुमार रॉय, कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे,

जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे, रिलायन्स फाउंडेशनचे नितीन शर्मा व जितेंद्र चौधरी, नाबार्डचे दिलीप दमय्यावार, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले, शास्त्रज्ञ राकेश माहेश्वरी, कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, उपविभागीय कृषी अधिकारी विठ्ठल गीते यांची उपस्थिती राहणार आहे.

उद्‍घाटनानंतर दादा लाड व डॉ. राहुल फुके हे कापूस तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करणार आहेत. गुरुवारी (ता. ३०) महिला मेळाव्याच्या उद्‍घाटन प्रसंगी महिला व बालकल्याण विभागाच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, विधान परिषदेच्या सदस्य चित्रा वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे डॉ. संजय तुबाकले, महिला आर्थिक विकास महामंडळाचे अनंत खेत्री उपस्थित राहणार आहेत.

Agriculture Technology
Agriculture Technology: शक्तिचलित मळणी यंत्राचे प्रकार, अंतर्गत घटक

सोलापूर येथील उद्योग वर्धिनीच्या अध्यक्षा चंद्रिका चव्हाण या ग्रामीण महिलांसाठी उद्योगाच्या संधी, पीव्हीजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहायक प्रा. प्रज्ञा कुलकर्णी या निरामय निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली, स्वनाथ फाउंडेशनच्या श्रेया भारतीय या महिलांचे सामाजिक योगदान, डॉ. प्रियांका भालेराव या स्त्रियांमधील वाढत्या व्याधी आणि काळजी तर मोनार्क कॅन्सर हॉस्पिटलच्या डॉ. सुप्रिया सोनजे या कर्करोगाविषयी महिलांना मार्गदर्शन करणार आहेत.

Agriculture Technology
Agriculture Technology: फळाफुलांच्या मूल्यवर्धनासाठी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरा

शुक्रवारी (ता. ३१) समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाशकुमार यांची उपस्थिती राहणार आहे. सह्याद्री फार्म्सचे संचालक विलास शिंदे हे मराठवाड्यातील शेती-आव्हाने व भविष्याची दिशा तर रिश ॲग्रो प्रायव्हेट लि.चे रविराज साबळे शाश्वत शेतीसाठी फळबाग लागवड तर तुषार जाधव हे शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर याविषयी माहिती देणार आहेत.

विविध कार्यक्रमांचे आयोजन

एआय तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक, दादा लाड कापूस तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती, पीक प्रात्यक्षिके, कृषी क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञान, कृषी प्रदर्शन, कृषी यांत्रिकीकरण, पीक परिसंवाद, महिला मेळावा, यासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com