Truthful seed : सत्यप्रत बियाण्यांची विक्री व वितरण साथी पोर्टलवरून करण्यास राज्य सरकारने दिली मान्यता

Kharif Season : खरीप २०२३ पासून या पोर्टलवरून राज्य बीज प्रामाणिककरण यंत्रणेच्या माध्यमातून कार्यवाही सुरू आहे. यामध्ये बियाणे कंपन्यांचे पैदासकार, पायाभूत व प्रमाणित बिजोत्पादन कार्यक्रमाची प्रकिया केली जाते.
Truthful seed
Truthful seed Agrowon
Published on
Updated on

Seed company In Maharashtra : राज्यामध्ये सत्यप्रत बियाणे विक्री व वितरणासाठी साथी पोर्टलवरून करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. २०२५ च्या खरीप हंगामापासून साथी पोर्टलवरून विक्री करता येणार आहे. शेतकऱ्यांना बनावट बियाणे देऊन फसवलं जातं. त्यामुळे आता सत्यप्रत बियाणे विक्री आणि वितरण साथी पोर्टलवरून करण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारदेखील या पोर्टलवर सत्यप्रत बियाणे कार्यन्वित करण्याच्या प्रयत्न करत आहे.

मार्च महिन्यात प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत केंद्र सरकारकडून सत्यप्रत बियाणाचा साथी पोर्टलवर समावेश होईपर्यंत उद्योगाचा अभिप्राय लक्षात घेऊन सत्यप्रत बियाणे पोर्टलवरून विक्रीसाठी उपलब्ध करण्याची सूचना केली होती. तसेच मुख्यमंत्र्यांनी २० मार्च रोजी झालेया बैठकीत खरीप हंगामापासून सत्यप्रत बियाणे साथी पोर्टलवरून विक्री करण्याची सूचना दिली आहे.

Truthful seed
Seed Demand : हिंगोली जिल्ह्यात ७५,४९० क्विंटल बियाण्यांची मागणी

खरीप २०२३ पासून या पोर्टलवरून राज्य बीज प्रामाणिककरण यंत्रणेच्या माध्यमातून कार्यवाही सुरू आहे. यामध्ये बियाणे कंपन्यांचे पैदासकार, पायाभूत व प्रमाणित बिजोत्पादन कार्यक्रमाची प्रकिया केली जाते. तसेच खरीप २०२४ पासून कृषी विभागाच्या संनियंत्रणाने उत्पादित केलेल्या प्रमाणित बियाण्याचे वितरण याच पोर्टलवरून सुरू करण्यात आलं.

पोर्टलचा उद्देश काय?

सत्यप्रत प्रामुख्याने खाजगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडून संशोधित केलेली वाणाचे बियाणे असतात. शेतकऱ्यांच्या एकूण बियाण्यात ७०-८० टक्के बियाणे सत्यप्रत असते. त्यामुळे या बियाणाची वितरण प्रणाली ट्रेसेबल करण्यास मदत साथी पोर्टलवरून होईल. तसेच उत्पादक ते शेतकरी यांच्यात प्रत्येक टप्प्यात नियंत्रण ठेवून पारदर्शकता वाढेल. बनावट, कालबाह्य आणि अनधिकृत बियाणे विक्रीस लगाम लागले. तसेच शेतकऱ्यांना खात्रीशीर बियाणे उपलब्ध होईल. उत्पादक, वितरक आणि विक्रेते यांच्यात समन्वय निर्माण करून व्यवस्थापन करता येईल, असा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे.

सत्यप्रत बियाणे म्हणजे काय?

सत्यप्रत बियाणे म्हणजे शुद्ध आणि उच्च दर्जाची बियाणे. या बियाण्यासाठी उत्पादक कंपन्यांना गुणवत्तेचं प्रमाणीकरण करावं लागतं. त्यासाठी सरकारने नियमावली निश्चित केलेली आहे. राज्य सरकारने सत्यप्रत बियाणे विक्रीसाठी साथी पोर्टलवरील उत्पादक, वितरण आणि विक्रेते यांची जबाबदारी स्पष्ट केली आहे.

जबाबदारी काय?

बियाणांच्या किमान गुणवत्तेच्या निकषांची पूर्तता करणे. बियाण्यांची उगवणक्षमता टक्केवारी, शुद्धता आणि आर्द्रता पातळी शासकीय निश्चित मानकांनुसार हवी. साथी पोर्टल अनुरूप सत्यप्रत बियाणांना योग्य लेबलिंग आवश्यक आहे.

Truthful seed
Fake Seeds Law: बोगस बियाणांबाबत अशासकीय विधेयक; दंड, शिक्षावाढीसाठी तरतूद

दरम्यान, साथी पोर्टलवरून वितरण आणि विक्रीची शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे, तसेच प्रसिध्दीच्या सूचना राज्य सरकारने कृषी आयुक्तालयाला केल्या आहेत. तर शेतकऱ्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी हेल्प डेस्क स्थापन करण्याची सूचना करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com