
Hingoli News : हिंगोली ः कृषी विभागाच्या अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यात या वर्षीच्या (२०२५) खरीप हंगामात विविध पिकांची ३ लाख ५४ हजार ४५५ हेक्टर पेरणी प्रस्तावित आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध करून व्हावे यासाठी सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकांच्या ७५ हजार ४९० क्विंटल बियाण्याची आणि कपाशी बियाण्याच्या १ लाख ५२ हजार पाकिटांची मागणी सार्वजनिक तसेच खासगी बियाणे उत्पादकांकडे केली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
हिंगोली जिल्ह्यातील यंदाच्या प्रस्तावित क्षेत्रानुसार सार्वजनिक क्षेत्रातील (महाबीज) बियाणे उत्पादकांकडे ७ हजार ८१९ क्विंटल आणि खासगी बियाणे कंपन्यांकडे ६७ हजार ६७१ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली. खरिपातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनची यंदा २ लाख ७९ हजार २१३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. त्यासाठी ७३ हजार २९३ क्विंटल बियाणे आवश्यक आहे. महाबीजकडे ७ हजार ५०५ क्विंटल तर खासगी बियाणे कंपन्यांकडे ६५ हजार ७८८ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे.
तुरीची ३१ हजार ९९७ हेक्टर पेरणी प्रस्तावित आहे. त्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बियाणे उत्पादकांकडे २३५ क्विंटल आणि खासगी बियाणे उत्पादकांकडे १ हजार ४४४ क्विंटल मिळून एकूण १ हजार ६७९ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. मुगाचे प्रस्तावित क्षेत्र ५ हजार ३९३ हेक्टर आहे.एकूण ११८.६५ क्विंटल बियाण्याची मागणी आहे. उडदाचे प्रस्तावित क्षेत्र ४ हजार ५ हेक्टर आहे तर एकूण १४० क्विंटल बियाण्याची मागणी आहे. ज्वारीचे प्रस्तावित क्षेत्र २ हजार २४१ हेक्टर असून बियाण्याची मागणी १६८ क्विंटल आहे.
बाजरीचे प्रस्तावित त्रक्षेत्र ८ हेक्टर असून बिण्याची मागणी २४ किलो आहे. मक्याचे प्रस्तावित क्षेत्र ८१३ हेक्टर असून ३६.५९ क्विंटल बिण्याची मागणी आहे. तिळाचे प्रस्तावित क्षेत्र २० हेक्टर असून २८ किलो बियाण्याची मागणी आहे. सूर्यफुलाचे प्रस्तावित क्षेत्र २० हेक्टर असून ८३ किलो बियाण्याची मागणी आहे. भुईमुगाचे २ हेक्टरसाठी २ क्विंटल बिण्याची मागणी आहे. इतर पिकांचे प्रस्तावित क्षेत्र ३५२ हेक्टर असून त्यासाठी ५० क्विंटल बियाण्याची मागणी आहे.
कपाशीच्या १ लाख ५२ हजार पाकिटांची मागणी
जिल्ह्यात यंदा कपाशीची ३० हजार ४०० हेक्टरवर लागवड प्रस्तावित आहे.त्यासाठी विविध वाणांच्या १ लाख ५२ हजार बियाणे पाकिटांची मागणी खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे करण्यात आली आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.