Green Manuers Seed : हिरवळीच्या खत बियाण्यांची टंचाई ; सातारा जिल्ह्यात बाजारात बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची धावपळ
Satara News : सातारा : शेतात सेंद्रिय हिरवळीचे खत तयार करण्यासाठी ताग व धैंचा या पिकांचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यासाठी जिल्हा परिषदेने यंदापासून सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी ताग, धैंचाच्या खत बियाण्यांसाठी अनुदान जाहीर केले आहे.
मात्र, ही दोन्ही बियाणे बाजारात अल्प प्रमाणात उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना बियाणे मिळविताना अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांना बियाणेच मिळविताना कसरत करावी लागते, तर अनुदान कसे मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रासायनिक शेतीमुळे उत्पन्न वाढत असले, तरी पिकातून येणारी उत्पादने रसायनयुक्त मिळत आहेत. यामुळे मानवी आजारांमध्ये वाढ झाली आहे. विषमुक्त, रसायनमुक्त अन्नधान्य व इतर पिकांसाठी रासायनिक शेतीला पर्याय म्हणून सेंद्रिय शेतीकडे पाहिले जात आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांत रासायनिक खतांचा वापर कमी करून शेती पिकात शेतकऱ्यांकडून नव-नवीन प्रयोग सुरू आहेत.
यामध्ये सध्याच्या काळात सेंद्रिय शेती करण्याकडे शेतकऱ्यांची पावले वळली आहेत. पिकाची वाढ होण्यासाठी व शाश्वत उत्पन्न मिळण्यासाठी जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे. जमिनीची संरचना व घडण उत्तम राहण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी ताग व धैंचा ही हिरवळीच्या खते वापरली जात आहेत. शासनाच्या वतीने बियाण्यांना अनुदान दिले जात आहे, तर दुसरीकडे ही बियाणे बाजारात उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची धावपळ होत आहे.
अनुदान जाहीर
सेंद्रिय हिरवळीचे खत तयार करण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात वापर करत असलेल्या ताग व धैंचा या खतांचा बियाण्यांसाठी जिल्हा परिषदेने अनुदान जाहीर केले आहे. यामध्ये ०.४० हेक्टरसाठी किमतीच्या पन्नास टक्के किंवा १५०० यापैकी कमी असेल इतके अनुदान देण्यात येणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.