Electricity Tariff : देशभरातील वीजदर कमी होण्याची शक्यता

Solar Power : सौर ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक कमी होऊन उत्पादन वाढले आहे. एकूणच वीज उत्पादनाचा खर्च कमी झाला आहे.
Electricity
Electricity Agrowon
Published on
Updated on

Latur News : काही दिवसांत सोलार पॅनेलसह सौर ऊर्जा निर्मिती साहित्याच्या किमती कमी झाल्या आहेत. सौर ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक कमी होऊन उत्पादन वाढले आहे. एकूणच वीज उत्पादनाचा खर्च कमी झाला आहे.

त्यामुळे ग्राहकांना पुरवठा करण्यात येणाऱ्या विजेचे दर कमी कसे कमी करता येतील, यावर लेह येथे २८ ते ३० जून दरम्यान झालेल्या संसदीय ऊर्जा समितीच्या बैठकीत सखोल चर्चा झाली आहे. यामुळे लवकरच देशभरातील वीजदर कमी होऊन ग्राहकांना दिलासा मिळेल, अशी आशा संसदीय ऊर्जा समितीचे सदस्य व लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी दिली.

Electricity
Electricity : अहिल्यानगर मंडळामध्ये ठेवीच्या व्याजाचे समायोजन

लेह-लडाख येथे संसदीय स्थायी ऊर्जा समितीच्या तीनदिवसीय बैठकीत स्मार्टमीटरच्या उपयोगातून वीजबिलाच्या थकबाकीचे प्रमाण कमी करणे, वीजदर कमी करणे, वीज गळतीचे प्रमाण कमी करणे आदी विषयावर खलउकल झाला.

विविध ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपन्या, वीज उत्पादक, ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या, केंद्रीय ऊर्जा विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर वीज वितरण, पारेषण व निर्मिती कंपन्यांचाही बैठकीत मोठा सहभाग होता.

Electricity
Electricity Tariff Reduction: चार पूरक व्यवसायांना कमी दरात वीज मिळणार

ऊर्जा निर्मिती ही अखंड प्रक्रिया असून, त्यातील सुधारणांसाठी संसदेची स्थायी समिती असलेली ऊर्जा समिती केंद्र सरकारला नियमित सल्ला देण्याचे काम करते. देशभरातील ऊर्जा निर्मिती, पारेषण व वितरणाचा आढावा घेऊन त्यावर सरकारला सल्ला देण्यासाठी या आर्थिक वर्षातील समितीची पहिली बैठक लेह येथे घेण्यात आली.

बैठकीत सौर ऊर्जेसारख्या अपारंपरिक विजेचे उत्पादन वाढवणे, वीज वितरणात सुधारणा करून गळती व नुकसान कमी करणे, ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासह स्मार्ट मीटरवर चर्चाही चर्चा झाली. देशातील अनेक राज्यांतून स्मार्ट मीटरला विरोध सुरू आहे. या मीटरच्या माध्यमातून वीजबिल भरण्याबाबत ग्राहकांची मानसिकता तयार करण्याचा उद्देश, असल्याचे खासदार डॉ. काळगे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com