
Yavatmal : गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील विविध वर्गवारीतील साडेपाच लाखांहून अधिक ग्राहकांकडे तब्बल ६७१ कोटी वीजबिलाची मागणी होती. या मागणीनुसार महावितरणने वर्षभरात वेगवेगळ्या प्रकारची मोहीम राबवून ६३९ कोटी रुपये वसूल केले. तरीसुद्धा ४८ कोटी ५० लाखांहून अधिक वीजबिल थकित आहे. यासाठी आता महावितरण कारवाईच्या तयारीत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि इतर, असे मिळून साडेपाच लाख ग्राहक आहे. या ग्राहकांना महावितरणकडून नियमित वीज पुरवठा केल्या जात आहे. परंतु वीज बिलाचा भरणा करताना ग्राहक आखडता हात घेत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे महावितरणसमोर मोठ्या अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. विशेष म्हणजे ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करता यावा म्हणून महावितरणनेसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने उपाय योजना केल्या आहेत.
यामध्ये ऑनलाइन, वीजबिल न घेतल्यास सूट, शासकीय सुट्टीच्या दिवशी वीजबिल केंद्र सुरू ठेवणे, त्याचप्रमाणे बक्षीस सुद्धा ठेवण्यात येत आहे. तरीसुद्धा बहुतांश ग्राहक वीजबिलाचा भरणा करण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील विविध वर्गवारीतील ग्राहकांकडे वीजबिलाचे ६७१ कोटी रुपये वसूल होणे अपेक्षित होते. मात्र, महावितरणने धडक मोहीम राबविल्यानंतरही ६३९ कोटी रुपयांची वसुली वर्षभरात झाली.
या वसुलीमध्ये दारव्हा उपविभाग १०३ कोटी ७२ लाख, पांढरकवडा १८७ कोटी ३८ लाख, पुसद १२३ कोटी ८४ लाख, तर यवतमाळ उपविभागात २२४ कोटी ६२ लाख रुपये वीजबिलापोटी वसूल करण्यात आले आहे. यामध्ये तब्बल ४८ कोटी ५० लाखांचे वीजबिल थकित आहेत. ही वसुली ३१ मार्च २०२५ पर्यंत झाली आहे. आता उर्वरित थकबाकी वसुलीसाठी महावितरण कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहेत.
ग्राहकांना वीज खंडितचा होतोय त्रास
यंदा उन्हाने चक्क ४४ अंशापर्यंत मजल मारली होती. त्यामुळे विजेच्या मागणीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. मागणी वाढल्यामुळे वीज यंत्रणेवर चांगलाच लोड येत असून, अनेक भागातील रोहित्र जळत आहे. परिणामी, वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून, ग्राहक प्रचंड वैतागलेले आहेत. तर महावितरण केवळ दुरुस्तीची कामे चालू असल्याची बतावणी करीत आहे. वीज पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी नियमित बिल भरणाऱ्या ग्राहकांकडून केल्या जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.