
Pune News: वीज नियामक आयोगाने मंजूर केलेल्या महावितरणच्या पाच वर्षीय टेरिफ ऑर्डरमध्ये आयोगाने चार व्यवसायांची पोट वर्गवारी बदलली आहे. आता टिश्यूकल्चर, मशरूम कल्चर, ग्रीन हाऊसेस आणि रायपनिंग सेंटर या पूरक व्यवसायांचा कृषी पंपांच्या वर्गवारीत पुन्हा समावेश केला. त्यामुळे या पूरक व्यवसायांना कमी दरात वीज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून राज्यात हे व्यवसाय वाढीस चालना मिळणार आहे.
महाराष्ट्रातून टिश्यू कल्चर कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या असोसिएशन ऑफ प्लांट टिश्यू कल्चर इंडस्ट्रीजने सविस्तर हरकत नोंदवली होती. २००२ पासून टिश्यूकल्चरचा समावेश कृषी पंपाच्या वर्गवारीत होता. मात्र २०१२ पासून आयोगाने कृषी इतर ही वेगळी पोट वर्गवारी करून टिश्यू कल्चर व नर्सरीवर अन्याय केला होता. त्यामुळे वीजबिल दुप्पट दराने येत होते. शिवाय फिक्स चार्जदेखील दुप्पट होता.
याबाबत वेळोवेळी आयोगाकडे हरकती, अपील करण्यात आले होते. असोसिएशनने स्वतः व सर्व ४२ कंपन्यांकडून वैयक्तिकरित्या हरकती ऑनलाइन सबमिट केल्या होत्या. आयोगाने पुणे येथे आयोजित केलेल्या जन सुनावणीत टिश्यू कल्चर असोसिएशनचे म्हणणे सविस्तर ऐकून घेतले व नुकत्याच झालेल्या टेरीफ ऑर्डरमध्ये टिश्यू कल्चर समवेत ग्रीन हाऊसेस मशरूम कल्चर व रायपनिंग सेंटर यांची पोट वर्गवारी बदलून कृषी पंपांच्या वर्गवारीत पुन्हा समावेश केला.
वीजदरात सात टक्के घट
लो टेन्शन वीज ग्राहकांना प्रति एचपी फिक्स चार्ज हे १४२ रुपये, एचपी वरून ७५ रुपये एचपी करण्यात आले आहेत. फिक्स चार्जमध्ये जवळपास ४७ टक्के घट करण्यात आली आहे. वीजदर ६.८८ रुपये प्रति युनिट वरून ५.५२ रुपये प्रति युनिट म्हणजे जवळपास २० टक्के घट करण्यात आली आहे. तसेच हाय टेन्शन वीज ग्राहकांना फिक्स चार्ज तीन टक्के वाढविण्यात आला आहे. वीजदर ८.६९ रुपये प्रति युनिटवरून ८.०२ रुपये प्रति युनिट म्हणजेच ७ टक्के घट करण्यात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.