
Ahilyanagar News : वीज कायदा २००३ नुसार सुरक्षा ठेव भरणे वीज ग्राहकांसाठी बंधनकारक असून, ग्राहकांचा वार्षिक वीज वापर लक्षात घेऊन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. महावितरणकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या सुरक्षा ठेवीच्या रकमेवरील व्याजापोटी सन २०२४-२५ मध्ये महावितरणच्या अहिल्यानगर मंडळातील ६ लाख ९९ हजार २१३ वीज ग्राहकांना व्याजाच्या रूपाने ८ कोटी ८३ लाख १६ हजार रुपयांचा परतावा त्यांच्या मागील दोन महिन्यातील वीज बिलातून समायोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांनी महावितरणकडे सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक आहे. आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता २०२१ च्या विनिमय १३.१ नुसार वीजग्राहकांना सुरक्षा ठेव आकारण्यात येते. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते.
याआधीची जमा असलेली सुरक्षा ठेव व वीजवापरानुसार नव्याने निर्धारीत करण्यात आलेली सुरक्षा ठेव यांच्यातील फरकाची रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात येते. यापूर्वी सुरक्षा ठेव सरासरी एका बिलाच्या रकमेइतकी होती.
आता वीज ग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद करण्यात आली आहे.
वीज ग्राहकांच्या जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवरील व्याजापोटी अहिल्यानगर मंडळाअंतर्गत अश्या प्रकारे अहिल्यानगर मंडळात एकूण ६ लाख ९९ हजार २१३ ग्राहकांना ८कोटी ८३ लाख १६ हजार रुपयांचा परतावा समायोजित करण्यात आला आहे. अहिल्यानगर मंडळाअंतर्गत संबंधित वीजग्राहकांना यापूर्वी अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात आले आहे.
देण्यात आलेला परतावा असा (कंसात ग्राहक)
अहिल्यानगर ग्रामीण विभाग ः १ कोटी १७ लाख ४३ हजार (९९ हजार ९०१)
अहिल्यानगर शहर विभाग ः ३ कोटी ३६ लाख ३५ हजार (२ लाख २५ हजार ७२७)
कर्जत विभाग ः ८४ लाख ९१ हजार (७० हजार ३१५)
संगमनेर विभाग ः २ कोटी ५७ लाख ९१ हजार (२ लाख ३० हजार ३१८)
श्रीरामपूर विभाग ः ८६ लाख ५६ हजार (७२ हजार ९५२)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.