
Chh. Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर : वीजबिलाचा तपशील तसेच वीजपुरवठा बंद असण्याचा कालावधी व इतर माहिती ‘एसएमएस’द्वारे मिळवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील १३ लाखांहून अधिक ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदविला आहे.
छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील सर्व वर्गवारीतील एकूण १३ लाख ५६ हजार ९९० वीजग्राहकांपैकी १३ लाख ४४३ ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदवलेला आहे. यात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर या वर्गवारीतील ९ लाख ८० हजार ३८८ ग्राहकांपैकी ९ लाख २९ हजार ४६० ग्राहकांचा अर्थात जवळपास ९५ टक्के ग्राहकांचा तर कृषिपंप वर्गवारीतील ३ लाख ७६ हजार ६०२ ग्राहकांपैकी ३ लाख ७० हजार ९८३ ग्राहकांचा अर्थात ९८.५१ टक्के ग्राहकांचा समावेश आहे.
नव्याने नोंदणीसाठी तसेच आधी नोंदवलेला क्रमांक बदलण्यासाठी महावितरणशी संपर्क साधून सर्व वीजग्राहकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलात ६ लाख ४० हजार ३०९ वीजग्राहकांपैकी ६ लाख १८ हजार ४५८ ग्राहकांनी, छत्रपती संभाजीनगर शहर मंडलात ३ लाख ५९ हजार ८१५ वीजग्राहकांपैकी ३ लाख ४१ हजार ९०८ ग्राहकांनी, तर जालना मंडलात ३ लाख ५६ हजार ८६६ वीजग्राहकांपैकी ३ लाख ४० हजार ७७ ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदवलेला आहे.
या ग्राहकांना वीजबिलाची माहिती, तांत्रिक बिघाड किंवा नियोजित देखभाल व दुरुस्तीमुळे वाहिनीवरील बंद असलेला वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा कालावधी, मीटर रीडिंग, बिल भरण्याची अंतिम तारीख ही माहिती ‘एसएमएस’द्वारे पाठवण्यात येत आहे.
असा करा संपर्क...
छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, कृषी व इतर अशा सर्व वर्गवारीतील जवळपास ९६ टक्के ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकांची नोंदणी झालेली आहे. असे असले तरीही ज्या ग्राहकांना आपला मोबाईल क्रमांक बदलायचा आहे, अशा ग्राहकांनी तसेच ज्यांना नव्याने क्रमांक नोंदवायचा अशा ग्राहकांनी १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ व १८००-२३३-३४३५ या २४ तास सुरू असणाऱ्या टोल फ्री क्रमांकांवर किंवा https://pro.mahadiscom.in/ConsumerInfo/consumer.jsp या संकेतस्थळावर किंवा महावितरण अॅपवर नोंदणी करावी, असे आवाहनही मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.