Chana Sowing : हरभऱ्याची १ लाख ३९ हजार हेक्टरवर पेरणी

Rabi Season : यंदाच्या (२०२३) रब्बी हंगामात मंगळवार (ता.२१) पर्यंत हरभऱ्याची परभणी जिल्ह्यात पेरणी ६४ हजार ८४० हेक्टर (५७.८० टक्के) व हिंगोली जिल्ह्यात ७४ हजार २५५ हेक्टर (६१.८० टक्के) झाली आहे.
Chana Sowing
Chana SowingAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : यंदाच्या (२०२३) रब्बी हंगामात मंगळवार (ता.२१) पर्यंत हरभऱ्याची परभणी जिल्ह्यात ६४ हजार ८४० हेक्टर (५७.८० टक्के) व हिंगोली जिल्ह्यात ७४ हजार २५५ हेक्टर (६१.८० टक्के) अशी दोन जिल्ह्यात मिळून हरभऱ्याची एकूण १ लाख ३९ हजार ९५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर या दोन जिल्ह्यात एकूण रब्बीची २ लाख १० हजार ८५७ हेक्टरवर पेरा झाला आहे.

परभणी जिल्ह्यात मंगळवार (ता. २१) पर्यंत रब्बीच्या सरासरी २ लाख ७० हजार ७९४ हेक्टर पैकी १ लाख २३ हजार २२१ हेक्टरवर (४५.५) पेरणी झाली आहे.त्यात रब्बी ज्वारीची १ लाख १३ हजार ८९ पैकी ४८ हजार ८४६ हेक्टरवर (४३.१९ टक्के), गव्हाची ३९ हजार ३०८ पैकी ८ हजार ३४ हेक्टर (२०.४४ टक्के) पेरणी झाली आहे.

Chana Sowing
Chana Sowing : खानदेशात हरभरा पेरणी पूर्ण

हरभऱ्याची १ लाख १२ हजार १७० पैकी ६४ हजार ८४० हेक्टर (५७.८० टक्के) तर करडईची ३ हजार ३७१ पैकी ८७९ हेक्टर (२६.०८ टक्के) पेरणी झाली आहे.हिंगोली जिल्ह्यात मंगळवार (ता. २१) पर्यंत रब्बीच्या सरासरी १ लाख ७६ हजार ८९१ हेक्टर पैकी ८७ हजार ६३६ हेक्टर (४९.५४ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीची ११ हजार ६९७ पैकी ३ हजार ८८३ हेक्टर (३३.२० टक्के), गव्हाची ४२ हजार ५०५ पैकी ९ हजार १८२ हेक्टर (२१.६० टक्के) पेरणी झाली.

Chana Sowing
Chana Sowing : सोलापूरमध्ये हरभरा क्षेत्रात मोठी वाढ

हरभऱ्याची १ लाख २० हजार १४७ पैकी ७४ हजार २५५ हेक्टर (६१.६९ टक्के), करडईची २०५ पैकी १६९ हेक्टर (८२.१७ टक्के) पेरणी झाली आहे. या दोन जिल्ह्यातील जिरायती क्षेत्रात ओलाव्याअभावी पेरणी शक्य नाही. त्यामुळे मोठे क्षेत्रनापेर राहणार आहे. परंतु ओलिताची सोय असलेल्या क्षेत्रात पेरणी सुरु आहे.

परभणी-हिंगोली जिल्हा हरभरा पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये) (मंगळवार ता.२१ पर्यंत)

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

परभणी २५००० २१३९७ ८५.५९

जिंतूर ३२८९० १६३५० ४९.५०

सेलू १०६३५ ४९६९ ४६.७२

मानवत ५७९३ ४२२८ ७२.९८

पाथरी ४२५६ ४२९९ १००.९९

सोनपेठ ६९०३ ६८०७ ९८.६०

गंगाखेड १११८६ ३८०० ३३.९७

पालम ५७६१ २७९० ४८.४३

पूर्णा ९६५४ २०० २.०७

हिंगोली २२०१७ १३९१५ ६३.२०

कळमनुरी ३८२४९ १३५३० ३५.३७

वसमत १९५२४ ७५०३ ३८.४३

औंढा नागनाथ १६९७८ २३५०० १३८.४१

सेनगाव २३३७९ १५८०७ ६७.६१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com