Rabi Season : रब्बी हंगामात आंतरपीक पध्दतीचा अवलंब करावा

Rabi Update : रब्बी हंगामात हरभरा अधिक करडई, ज्वारी अधिक करडई या आंतरपीक पध्दतीचा अवलंब गरजेचा आहे
Rabi Season
Rabi SeasonAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : सोयाबीन काढणीनंतर लगेच जमिनीतील ओलावा उडून जाण्यापूर्वी रब्बी पिकांची पेरणी करावी. विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणांच्या बियाण्यांचा वापर करावा. उत्पादन व उत्पन्नाची जोखीम कमी करण्यासाठी रब्बी हंगामात हरभरा अधिक करडई, ज्वारी अधिक करडई या आंतरपीक पध्दतीचा अवलंब गरजेचा आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. वा. नि. नारखेडे यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्‍प येथील हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषी उपक्रमांतर्गत (निक्रा प्रकल्‍प) नुकतेच रब्बी हंगामाचे नियोजन यावर चर्चासत्राचे आयोजन करण्‍यात आले होते.

Rabi Season
Banana Crop Insurance : केळी पीकविमा योजनेला जळगावात कमी प्रतिसाद

यावेळी ते बोलत होते. अभियंता डॉ. मदन पेंडके, वरिष्ठ कृषिविद्यावेत्ता डॉ. आनंद गोरे मृदशास्त्रज्ञ डॉ. पी. एच. गौरखेडे आदी उपस्थित होते. डॉ. पेंडके म्हणाले, की ठिबक सिंचन व तुषार सिंचन पद्धतीने पिकांना पीक फुलोऱ्यावर असताना व दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना पाणी द्यावे.

Rabi Season
Onion Market : लासलगाव बाजार समितीत आजपासून १२ दिवस कांद्याचे लिलाव बंद

डॉ. गोरे म्‍हणाले, की तेलबिया व दाळवर्गीय पिकांमध्ये स्फुंद व गंधकयुक्त खतांचा वापर करावा. याशिवाय रब्बी पिकांमध्ये वेळेवर पेरणी, लागवडीचे अंतर रब्बी ज्वारी व करडई ४५ सें. मी तर कोरडवाहू हरभरा ३० सें. मी. तर बागायत हरभरा ४५ सें. मी. अंतरावर लागवड करावी, बीज प्रक्रिया, वेळेवर पीक संरक्षण व संरक्षीत सिंचन पंचसुत्रीचा अवलंब करावा.

कार्यक्रमास निक्रा प्रकल्‍पात संशोधनात्मक पीक प्रात्यक्षिक योजनेसाठी निवडलेल्या उजळांबा, बाभुळगाव व सोन्ना या गावामधील ३८ शेतकऱ्यांना सहभाग घेतला होता. यावेळी सरंपच (बाभूळगाव) सपना रामदास दळवे, सरंपच (उजळांबा) विठ्ठलराव धोतरे, सोन्नाचे सरपंच बाळासाहेब देशमुख आदीसह दत्‍तक गावातील शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com