Rabi Season : गिरणा पट्ट्यात खरिपासह रब्बीलाही २५ टक्के फटका

Rabi Crop : गिरणा पट्ट्यात खरिपापाठोपाठ रब्बी हंगामाचीही दैनावस्था होत असून ‘कडेवरचे गेले आता पोटातल्याची आशा’ अशा अपेक्षेत शेतकरी आहेत.
Rabi Season
Rabi Seasonagrowon
Published on
Updated on

Jalgaon News : गिरणा पट्ट्यात खरिपापाठोपाठ रब्बी हंगामाचीही दैनावस्था होत असून ‘कडेवरचे गेले आता पोटातल्याची आशा’ अशा अपेक्षेत शेतकरी आहेत. अशातच कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा ठरत आहे. यंदा पावसाचा अनियमितपणा, अवेळी झाल्याने खरीप हंगाम हातचा गेला. जे उत्पादन हाती आले त्यातून बळीराजाला श्रमाचा मोबदला तर सोडा परंतु झालेला खर्चही निघाला नाही.

त्यामुळे रब्बी हंगामावर त्याचा परिणाम जाणवत आहे. एकूण क्षेत्राच्या अवघे २५ टक्के रब्बी पेरणीचे क्षेत्र आहे. गेल्या वर्षापेक्षा यावर्षी सुमारे पंधरा टक्क्यांनी रब्बीचे क्षेत्र कमी झाले असल्याचे चित्र आहे. हंगाम हातचा गेल्याने शेतकरी कमालीच्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

Rabi Season
Rabi Season : रब्बी हंगामात कसोटी

ज्यांच्याजवळ पाण्याची व्यवस्था आहे, त्यांनी मिळेल त्या व्याजदराने पैसा उचलून रब्बी पेरणीची हिंमत दाखवली. रब्बीतून खरीपाच्या नुकसानीतून सावरता येईल, असा आशावाद उराशी बाळगून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी केली. परंतु सध्याची स्थिती पाहता खरिपा पाठोपाठ रब्बीही हातचा जाऊन बळीराजा आर्थिक विवंचनेत सापडण्याची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.

पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस लागवडीचे क्षेत्र ‘जैसे थे’ असले तरी पाऊस कमी झाल्याने शेवटपर्यंत पाणी देऊन कापूस पीक जगवणे अशक्य होणार आहे. कापसाला सात हजारापर्यंत भाव मिळत असल्याने भावा संदर्भातील शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. दादर, ज्वारी, मका यांचा पेरा करण्यात आला असला तरी सिंचन प्रकल्पातील पाण्याचा साठा व विजेचा पुरवठा पाहता या पिकांचे समाधानकारक उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती लागेल असे सध्या तरी दिसत नाही.

Rabi Season
Rabi Season : परतीच्या पाऊस नसल्याने रब्बी पिकावर मोठा परिणाम, राज्यात फक्त २८ टक्के पेरण्या

वीजपुरवठ्याची समस्या

वीज वितरणतर्फे सहा तास वीज देण्याचे धोरण राबविण्यात येत असून टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा दिला जात असल्याने सध्या तरी वीजपुरवठा पूर्ण दाबाने मिळून पिकांना पाणी देऊन जगवणे शक्य होत आहे. एकूणच सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा, भूजल पातळी व विहिरींची पातळी लक्षात घेता पाणी देऊन पिके जगवणे व उत्पादन हाती घेणे जिकरीचे होणार असल्याचा सूर जाणकार शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

जगतील तोपर्यंत पिके जगवू, वीज व पाण्याचा प्रश्न गंभीर झाला तर आहे तो चारा काढून शेती मोकळी करू अशा प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करू लागले आहेत. उन्हाळ्यात पाण्याअभावी भयावह परिस्थिती निर्माण होण्याचे भाकीत केले जात आहे. पाण्याची टंचाई, विजेचा कमी दाबाने पुरवठा व नियोजन शून्यात याचे चटके शेतकऱ्यांसह सर्वांनाच सोसावे लागणार असल्यास सूर व्यक्त होऊ लागला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com