Animal Government Rule : इअर टॅगिंग असेल तरच जनावरांना नुकसानभरपाई, सरकारचा नव्या आदेशाने शेतकऱ्यांची पंचाईत

New Rules Government : सरकारच्या नव्या नियमानुसार इअर टॅगिंग (१२ अंकी बार कोडेड) असणाऱ्या जनावरांनाच नुकसानभरपाई मिळणार आहे.
Animal Government Rule
Animal Government Ruleagrowon

Ear Tagging Animal : कोणत्याही पाळीव जनावरांना नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का, वन्यप्राण्यांच्या हल्ला झाल्यास त्याच्या मृत्यू पाश्चात बाधीत शेतकऱ्याला पंचनाम्यानंतर काही दिवसात शासनाकडून नुकसानभरपाई हमखास मिळायची. परंतु आता ही रक्कम मिळणे कठीण झाले आहे. सरकारच्या नव्या नियमानुसार इअर टॅगिंग (१२ अंकी बार कोडेड) असणाऱ्या जनावरांनाच नुकसानभरपाई मिळणार आहे.

१ जूनपासून त्याची अंमलबजावणी होणार असून, टॅगिंग नसणाऱ्या जनावरांच्या खरेदी विक्रीलाही प्रतिबंध केला आहे. त्यामुळे इअर टॅगिंग नसणाऱ्या जनावरांचे पशुपालकांनी टॅगिंग करून घेणे आता अत्यावश्यक बनले आहे.

केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन अंतर्गत भारत पशुधन प्रणाली सुरू केली. यात जनावरांचे इअर टॅगिंग न केलेले जन्म-मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण, औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरण आदी न नोंदी ठेवल्याने संबंधित जनावराची सर्व माहिती उपलब्ध होत आहे. संभाव्य साथीच्या रोगाचे अंदाज व त्यावरील उपाययोजनांचे नियोजन करणे, उत्पादनातील वाढीसाठी इअर टॅगिंग बंधनकारक केले आहे.

दरम्यान, पशुसंवर्धन विभागाने इअर टॅगिंगबाबत कडक धोरण अवलंबल्याचे दिसून येत आहे. १ जूनपासून इअर टॅगिंग आणि त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय पशुधनाची खरेदी विक्री करता येणार नाही. तसेच यापूर्वी नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जनावरांचा मृत्यू झाला तर सरसकट नुकसानभरपाई मिळत होती; पण आता मृत्यू झालेल्या जनावराला इअर टॅगिंग असेल तरच नुकसानभरपाई मिळणार आहे. त्यामुळे पशुपालकांनी टॅगिंग नसलेल्या जनावरांचे टॅगिंग करून घेणे आवश्यक आहे; अन्यथा नुकसानभरपाईवर पाणी सोडावे लागणार आहे.

Animal Government Rule
Kolhapur Market Rate : आंब्याचे दर आवाक्यात तर भाजीपाला दरात तेजी, काय आहे मार्केट स्थिती?

पशुवैद्यकीय सेवा होणार बंद

जनावरांना पशुवैद्यकीय दवाखान्यातून सेवा दिली जाते. नव्या निर्णयानुसार १ जूनपासून इअर टॅगिंग नसणाऱ्या जनावरांना पशुवैद्यकीय दवाखान्यातून मिळणारी सेवा बंद होणार आहे. तसेच इअर टॅगिंग असल्याशिवाय जनावरांची परराज्यातून महाराष्ट्रात वाहतूक करता येणार नाही. त्यामुळे कर्नाटक सीमेलगत असलेल्या भागातील पशुपालकांची मोठी अडचण होणार आहे.

इअर टॅग न मारलेल्या जनावरांच्या पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. इअर टॅगिंग व भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करून दिली जाईल. त्यासाठी पशुपालकाचा आधार क्रमांक व मोबाईल आवश्यक आहे. ही प्रक्रिया मोफत आहे. - डॉ. सचिन घालवाडकर, पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती, गडहिंग्लज

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com