Operation Dronagiri: देशातील पाच जिल्ह्यांमध्ये ‘ऑपरेशन द्रोणागिरी’ची अंमलबजावणी सुरू

Security Operation: देशातील पाच जिल्ह्यांत ‘ऑपरेशन द्रोणागिरी’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला जात असून यामध्ये विशेष जिल्ह्यांपैकी एक म्हणून वाशीमचा समावेश करण्यात आला आहे. ‘ऑपरेशन द्रोणागिरी’ हा केवळ नावीन्यपूर्ण उपक्रम नसून तो जिल्ह्याला प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने एक नवी ओळख निर्माण करून देणारा उपक्रम ठरणार आहे.
Agriculture Security
Agriculture SecurityAgrowon
Published on
Updated on

Washim News: देशातील पाच जिल्ह्यांत ‘ऑपरेशन द्रोणागिरी’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला जात असून यामध्ये विशेष जिल्ह्यांपैकी एक म्हणून वाशीमचा समावेश करण्यात आला आहे. ‘ऑपरेशन द्रोणागिरी’ हा केवळ नावीन्यपूर्ण उपक्रम नसून तो जिल्ह्याला प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने एक नवी ओळख निर्माण करून देणारा उपक्रम ठरणार आहे.

Agriculture Security
Agriculture Technology: फळाफुलांच्या मूल्यवर्धनासाठी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरा

ऑपरेशन द्रोणागिरी या महत्त्वाकांक्षी उपक्रमात महाराष्ट्रातील वाशीम हा एकमेव जिल्हा निवडण्यात आला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने (DST) डिसेंबर २०२२ मध्ये सुरू केलेल्या या राष्ट्रीय जिओस्पेशियल धोरणाअंतर्गत (NGP) भारताला जिओस्पेशियल तंत्रज्ञानात जागतिक नेता बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Agriculture Security
Food Security Issue : अन्नसुरक्षेचे गंभीर आव्हान

ऑपरेशन द्रोणागिरी ?

ऑपरेशन द्रोणागिरी ही NGP च्या अंमलबजावणीतील पहिला टप्पा आहे. नोव्हेंबर २०२४ ते जून २०२५ दरम्यान देशातील पाच राज्यांतील सहा जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील वाशीम, उत्तर प्रदेशातील वाराणसी, हरियानातील सोनीपत आणि गुरुग्राम, आसाममधील कामरूप आणि आंध्र प्रदेशातील विजयनगरचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्याला विशिष्ट क्षेत्रांशी संबंधित आव्हानांसाठी पायलट प्रकल्प म्हणून निवडण्यात आले असून वाशीम जिल्हा कृषी क्षेत्रात जिओस्पेशियल तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी पायलट म्हणून निवडला आहे.

‘ऑपरेशन द्रोणागिरी’मुळे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तांत्रिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वापरला जाईल. ड्रोनच्या माध्यमातून अचूक फवारणी, पिकांचे आरोग्य निरीक्षण आणि कीड व रोग व्यवस्थापन करणे अधिक सुलभ होईल. याशिवाय, स्थानिक युवक आणि महिलांना जिओ स्पेशियल तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळाल्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.
बुवनेश्वरी एस, जिल्हाधिकारी, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com