
Pune News: राज्यातील फळ व फूल पिकांच्या मूल्यवर्धनासाठी मॅग्नेट प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या माध्यमातून जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरून प्रभावी विपणन करून, जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवा. यासाठी माहिती तंत्रज्ञान, समाजमाध्यमांचा देखील प्रभावी वापर करा, अशा सूचना पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या.
आशियायी विकास बँक अर्थसाह्यित महाराष्ट्र अँग्रीबिझिनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाची मंत्री श्री. रावल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मुंबई येथे सह्याद्री अतिथिगृह येथे बैठक झाली. या बैठकीस आशियायी विकास बँकेचे संचालक टाकेशी उएडा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, मॅग्नेट प्रकल्प संचालक विनायक कोकरे, अतिरिक्त प्रकल्प संचालक अमोल यादव, पणन विभागाचे उपसचिव संतोष देशमुख तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या वेळी मंत्री रावल म्हणाले, की मॅग्नेट प्रकल्पांतर्गत प्रमुख १४ फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. या पिकांच्या मूल्यवर्धन आणि मूल्यसाखळी विकसित करत असताना, या पिकांच्या उत्पादन ते ग्राहकांपर्यंत वितरण होण्यासाठी स्थानिक भाषेचा उपयोग करून प्रसिद्धी करावी. तसेच निर्यात करताना प्लॅस्टिकचा वापर न करता जैव विघटनशील साहित्याचा वापर करावा.
मंत्री श्री.रावल म्हणाले, की फळे आणि भाजीपाल्यांचे नुकसान कमी होणे आणि साठवणूक क्षमता वाढविणे गरजेचे आहे. मॅग्नेट प्रकल्पाचे उद्देश साध्य करण्यासाठी उत्पादक तसेच उद्योजकांना संघटित बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी आवश्यक तांत्रिक साहाय्य, पायाभूत सुविधा उभारणीसाठी साह्य, मध्यम मुदत कर्ज आणि खेळते भांडवल पुरविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.