Krushik 2025 : शेतीत तंत्रज्ञानाचा उपयोग वाढवून पीक पद्धतीत बदल करावा : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे

Agriculture Minister Manikrao Kokate : उत्पादन वाढल्याने बाजारभाव कमी होऊन शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून पीक पद्धतीत बदल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, तसेच विमा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने आधार लिंक असलेले पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Ajit Pawar, Manikrao Kokate and Pankaja Munde
Ajit Pawar, Manikrao Kokate and Pankaja MundeAgrowon
Published on
Updated on

Baramati News : उत्पादन वाढल्याने बाजारभाव कमी होऊन शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून पीक पद्धतीत बदल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, तसेच विमा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने आधार लिंक असलेले पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. असे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी 'कृषिक २०२५' कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले.

अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने ‘कृषिक २०२५’ या जागतिक दर्जाच्या कृषी प्रदर्शनाचे उद्‌घाटन बुधवारी (ता. १५) शारदानगर, बारामती येथे करण्यात आले. हे प्रदर्शन गुरुवारपासून सोमवार (ता. १६ ते २०) पर्यंत शेतकऱ्यांसाठी खुले राहणार आहे. कृषिक प्रदर्शनातून बहुसंख्य शेतकरी, शास्त्रज्ञ, अधिकारी आणि उद्योजकांना कृषी क्रांतीची नवीन दिशा मिळणार आहे.

Ajit Pawar, Manikrao Kokate and Pankaja Munde
Krushik 2025 : अत्याधुनिक तंत्रज्ञानाने शेती किफायतशीर करण्याचे प्रयोग

या कार्यक्रमात पवार कुटुंबातील प्रमुख नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित असल्याने चर्चेचा विषय ठरला. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, क्रीडा मंत्री दत्तात्रेय भरणे तसेच राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि इतर मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात विविध शेतीविषयक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. उत्पादन वाढले की बाजारभाव कमी होतो यामुळे शेतकरी वर्गात समस्या निर्माण होतात. यावर पीक पद्धतीत बदल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे गरजेचे आहे, असे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

Ajit Pawar, Manikrao Kokate and Pankaja Munde
Krushik 2025 Exhibition : बारामतीत १६ पासून ‘कृषिक-२०२५’ प्रदर्शन

ड्रोन, आधार लिंक पोर्टल आणि थेट अनुदान यावर भर...

शेतीतील उत्पादन वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर या कार्यक्रमावेळी कृषिमंत्र्यांनी भर दिला. ड्रोनच्या मदतीने फवारणीच्या तंत्रज्ञानाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

याशिवाय विमा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आधार लिंक असलेले पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, सरकारकडून डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) माध्यमातून अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवण्याचा विचार सुरू आहे.

आर्थिक स्थैर्य आणि बाजारपेठेतील स्थिरता....

शेतीत प्रयोगशीलता आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यात मदत होईल. याचबरोबर बाजारपेठेतील स्थिरता निर्माण होईल, असेही कोकाटे यांनी कार्यक्रमात सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com