Horticulture Cluster Development: फलोत्पादनात आता दोन नवे समूह

Central Government Decision: फलोत्पादन समूह विकास कार्यक्रमात आता ‘उच्च मूल्य पिके’ व ‘भाजीपाला’ असे दोन स्वतंत्र समूह तयार करण्यास करण्यास मान्यता देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.
Horticulture
HorticultureAgrowon
Published on
Updated on

Pune News: फलोत्पादन समूह विकास कार्यक्रमात आता ‘उच्च मूल्य पिके’ व ‘भाजीपाला’ असे दोन स्वतंत्र समूह तयार करण्यास करण्यास मान्यता देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.

राष्ट्रीय फलोत्पादन मंडळामार्फत फलोत्पादन समूह विकास कार्यक्रम चार वर्षांपासून राबविला जात होता. आता त्यात बहुपीक उच्च मूल्य समूह आणि नागरी भाजीपाला समूह या दोन नव्या बाबींचा समावेश केला गेला आहे. या समूहांसाठी अंमलबजावणी संस्था निवडण्याचे काम राज्याच्या फलोत्पादन विभागाकडून चालू झाले आहे. यात एफपीओ, एफपीसी, फेडरेशन, सहकारी संस्था व सोसायट्या, भागीदारी संस्था व कंपन्यांना संधी मिळू शकते.

Horticulture
MGNREGA Horticulture : रोजगार हमी योजनेतून फुलवा फळबाग ः संजय अटक

मल्टी कमोडिटी हायव्हॅल्यू क्लस्टर, अर्थात ‘उच्च मूल्य पिके’ समूहात शक्यतो जमीन सलग हवी. मात्र संलग्न नसल्यास दोन ठिकाणांमधील अंतर डोंगरी भागात ५० किलोमीटर, तर इतर भागात ८० किलोमीटरपेक्षा जास्त नसावे. या प्रकल्पात पिकाचे वार्षिक मूल्य किमान १०० कोटी रुपये असावे. शासनाकडून या मूल्याच्या २५ टक्के अर्थसाह्य मिळणार आहे.

भाजीपाला समूहात काही पिके अनिवार्य असतील. यात टोमॅटो, कांदा, बटाटा, कोबी, फ्लॉवर, भेंडी, वांगी, सिमला मिरची, काकडी, भोपळा, लिंबू, आले, हिरवी मिरची व लसणाचा समावेश आहे. या समूहात प्रकल्पाचे सुविधा केंद्र शहरापासून ५० ते १०० किलोमीटरच्या आत ठेवावे लागेल. यात एफपीसी व एफपीओंसाठी ४० टक्के अर्थसाह्य राखीव ठेवण्यात आले आहे.

Horticulture
Buldana Horticulture Scheme : फळबाग लागवडीत बुलडाणा जिल्हा अव्वल ; ४०७४ हेक्टरवर लागवड करण्यात यश

योजनेविषयी

अनुदानासाठी सविस्तर माहिती राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या https://www.nhb.gov.in/ संकेतस्थळावर मिळेल.

समूह स्थापन करण्याबाबत समस्या असल्यास clusters.nhb@ gov.in येथे कळवता येतील. त्यासाठी मुदत २ मे २०२५ पर्यंत असेल.

या योजनेत अंमलबजावणी यंत्रणा म्हणून काम करणायचे असल्यास https://www.nhb.gov.in/OnlineApplication/Online_Registration_Intermediate_Page.aspx या संकेतस्थळावर २ मे २०२५ पर्यंत अर्ज करावे लागतील.

केंद्र शासनाने आधीच्या फलोत्पादन समूह विकास कार्यक्रमाचा आता विस्तार केला आहे. त्यात दोन नवे उपक्रम समाविष्ट केल्यामुळे शेतीमालासाठी शहरानजीक मूल्यसाखळीच्या पायाभूत सुविधा उभारणीस चालना मिळेल व यात शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी उत्पादक संस्थांचा सहभाग वाढेल.
डॉ. कैलास मोते, संचालक, फलोत्पादन विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com