MGNREGA Horticulture : रोजगार हमी योजनेतून फुलवा फळबाग ः संजय अटक

Orchard Management : अकोला जिल्ह्यात पातूर हा तालुका फळ, फूल, भाजीपालावर्गीय पिकांच्या लागवडीत अग्रेसर असलेला तालुका आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, त्यांना शेतीत शाश्वत रोजगार मिळावा आणि त्यांची आर्थिक उन्नती व्हावी, या उद्देशाने राज्य व केंद्र शासनाच्या कृषी विभागामार्फत अनेक योजना राबविल्या जात आहेत.
Fruit Farming
Fruit Farming Agrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा

Akiola News : अकोला ः जिल्ह्यात पातूर हा तालुका फळ, फूल, भाजीपालावर्गीय पिकांच्या लागवडीत अग्रेसर असलेला तालुका आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, त्यांना शेतीत शाश्वत रोजगार मिळावा आणि त्यांची आर्थिक उन्नती व्हावी, या उद्देशाने राज्य व केंद्र शासनाच्या कृषी विभागामार्फत अनेक योजना राबविल्या जात आहेत.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरलेली असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेतून फळबाग लागवड करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संजय अटक यांनी केले आहे.

कृषी विभागाने आता या योजनेत नवीन फळपिके आणि फुलपिकांचाही समावेश केला आहे. त्यामुळे आता वैयक्तिक शेताच्या सलग शेतावर तसेच पडीक जमिनीवरही फळझाडे व फुलपिकांची लागवड करणे शक्य होणार आहे. सलग फळबाग लागवडीमध्ये आंबा, चिकू, पेरू, डाळिंब, लिंबू, संत्री, सीताफळ, ड्रॅगनफ्रुट, ॲव्हाकडो, केळी, द्राक्ष यांसारख्या विविध फळपिकांची लागवड करता येईल. तर, पडीक जमिनीवर आंबा, बोर, नारळ, सीताफळ आणि फुलपिकांमध्ये गुलाब, मोगरा, निशिगंध यांसारख्या सुगंधी फुलांची लागवड करून शेतकरी अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात.

Fruit Farming
MGNREGA : वर्षभरात रोजगार हमी योजनेतून खोदल्या ४४० विहिरी

या योजनेतील विशेष बाब म्हणजे, लाभार्थी त्यांच्या शेतातील परिस्थितीनुसार लागवडीच्या अंतरात बदल करू शकतात. मात्र, विद्यापीठाच्या शिफारशीनुसार असलेल्या अंतराच्या मर्यादेतच अनुदानाची रक्कम देय राहील. अतिरिक्त कलमे किंवा रोपांसाठी अनुदान दिले जाणार नाही.

लागवड केलेल्या वर्षापासून पुढील तीन वर्षांपर्यंत मंजूर अंदाजानुसार शेतकऱ्यांना अनुदान मिळेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी, बागायती वृक्षांच्या बाबतीत किमान ९० टक्के आणि कोरडवाहू वृक्षांच्या बाबतीत किमान ७५ टक्के झाडे जिवंत राखणाऱ्या शेतकऱ्यांनाच पुढील वर्षांचे अनुदान मिळेल. सध्या मजुरीचा दर ३१२ रुपये प्रति मनुष्य दिवस निश्चित करण्यातआला आहे.

या पिकांची करता येणार लागवड

या योजनेत ड्रॅगनफ्रूट, अव्हाकॅडो, केळी, द्राक्ष यांसारख्या नवीन पिकांबरोबरच आंबा, चिकू, डाळिंब, बोर, सीताफळ, पेरू, कागदी लिंबू, मोसंबी, संत्रा, आवळा, कवठ, जांभूळ, नारळ, चिंच, फणस, अंजीर, पानपिंपरी, शेवगा, काजू या फळपिकांचा आणि गुलाब, मोगरा, निशिगंध या फुलपिकांचा समावेश आहे आणि या सर्वांसाठी अनुदान उपलब्ध आहे. योजनेच्या लाभाबाबत अधिक माहिती आणि अर्ज प्रक्रियेसाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com