
Buldana News : बुलडाणा : महाराष्ट्रात फळबाग लागवडीत बुलडाणा जिल्ह्याने या आर्थिक वर्षात मोठी आघाडी घेतली आहे. २०२४-२५ या वर्षात जिल्ह्यात तब्बल ४०७४ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली आहे. प्रामुख्याने जळगाव जामोद, संग्रामपूर या दोन तालुक्यांनी याक्षेत्रात दमदार कामगिरी केली आहे.
जिल्ह्याने केलेल्या या कामगिरीची दखल घेत गेल्या आठवड्यात पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांचा यासाठी कृषिमंत्र्यांच्या हस्ते गौरवही करण्यात आला.
बुलडाणा जिल्ह्यात फलोत्पादना मोठा वाव असल्याने जिल्हा अधीक्षकांनी आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या साह्याने सर्व तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून फळबाग लागवडीला प्रोत्साहन दिले. त्यामुळे जिल्ह्याने दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे.
जिल्ह्यात मुख्यतः संत्र्याची कलमे १५३९ हेक्टरवर लावण्यात आली. यानंतर केळी ६४०, आंबा ४६९.२९ हेक्टर, सीताफळ २४०.५७ हेक्टर, बांबू ६०६ हेक्टर, लिंबू १०१.२६ हेक्टर, पेरू ५८.११, यासह चिकू, बोर, जांभूळ, ड्रॅगन फ्रूट, आवळा, शेवगा, गुलाब अशा विविध फळ-फुलझाडांची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे.
बुलडाण्याचे हवामान आणि जमिनीतून मिळणाऱ्या पोषणतत्वांचा फायदा घेत शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे कल वळवला आहे. जिल्हयात मनरेगाच्या माध्यमातून दोन हजार हेक्टरचा लक्षांक होता. त्यातुलनेत तब्बल २७५५ हेक्टरवर लागवड झाली. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचे १३०२ हेक्टर लक्षांक असताना १३१८ हेक्टरवर लागवड करण्यात यश आले आहे.येत्या काळात फळवर्गीय पिकांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकणार आहे.
योजनानिहाय लागवड
मग्रारोहयो- २७५५.७४ हेक्टर
भाऊसाहेब फुंडकर-१३१८.६६ हेक्टर
एकूण- ४०७४.४० हेक्टर
बुलडाणा जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी बदल स्वीकारून फळबाग लागवडीकडे कल दाखवला आहे. कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांचा पाठपुरावा, शेतकऱ्यांना देत असलेले प्रोत्साहन महत्वाचे ठरले आहे. हे सामूहिक प्रयत्नांचे यश मानले पाहिजे.
- मनोजकुमार ढगे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.