Education Policy : राज्यातील ५१६ शाळा आता होणार आदर्श

वाशीम केंद्र शासनाच्या तज्ज्ञ समितीने ‘पीएमश्री’ (पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया) योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ५१६ शाळांना मान्यता दिली आहे.
Education
EducationAgrowon
Published on
Updated on

Washim News : केंद्र शासनाच्या तज्ज्ञ समितीने ‘पीएमश्री’ (पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया) योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ५१६ शाळांना मान्यता दिली आहे. या शाळा आता आदर्श (Ideal School) म्हणून विकसित होणार आहेत. (Education Policy)

केंद्र सरकारने ७ सप्टेंबर २०२२ रोजी केंद्र पुरस्कृत पीएमश्री योजनेला मान्यता दिली. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि विशिष्ट कालावधीत आदर्श शाळा विकसित करणे, तसेच निष्पक्षता, प्रवेश, गुणवत्ता आणि समावेश या पातळ्यांवर सर्वसमावेशक, समर्पित समग्र परिवर्तन घडविणे हा या योजनेचा उद्देश आहे. या अनुषंगाने देशभरात एकूण १४ हजार ५०० शाळा निर्माण करण्यात येतील. ही योजना पाच वर्षांसाठी राबविली जाईल.

Education
Agriculture Education : कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

शाळांची पारदर्शकपणे निवड करण्यासाठी pmshrischools.education.gov.in या पोर्टलवर शाळांनी स्वतः अर्ज करून विविध तीन आव्हानांचे टप्पे पार करणे आवश्यक होते. त्यानुसार प्राथमिक आणि माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांनी ऑनलाइन अर्ज केले.

Education
Girls Education : मुलींसाठी नर्सिंग, पॅरामेडिकल, फार्मसीतील करिअर

या टप्प्यांमध्ये पात्रतेस शहरी भागांसाठी ७० टक्के तर ग्रामीण भागांसाठी ६० टक्के गुण मिळविणे आवश्यक होते. हे टप्पे पार करणाऱ्या शाळांची तज्ज्ञांच्या समितीने निवड केली आहे. राज्यशासन प्रतिशाळा पाच वर्षांसाठी १.८८ कोटींचा निधी देणार आहे.

जिल्हानिहाय मान्यताप्राप्त शाळा स्थिती

अकोला ११, बुलडाणा २२, वाशीम ७, अमरावती १८, औरंगाबाद ११, बीड १३, भंडारा १२, गोंदिया १३, हिंगोली ५, जळगाव १८, लातूर १३, नागपूर २१, नांदेड १८, नंदुरबार ८, पालघर ११, परभणी ११, चंद्रपूर १८, उस्मानाबाद ९, नगर २१, गडचिरोली १६, कोल्हापूर १८, नाशिक २६, पुणे २३, रायगड २०, रत्नागिरी १३, सांगली १४, सातारा १८, सिंधुदुर्ग १३, सोलापूर २३, ठाणे १४, वर्धा १३, यवतमाळ २६, धुळे ७ आणि जालना जिल्ह्यांतील १२ शाळांना ‘पीएमश्री योजने’ अंतर्गत मान्यता मिळाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com