PM Modi Oath Ceremony : मोदींची हॅट्ट्रीक! तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ; मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

Narendra Modi Oath Ceremony : भाजप, नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीएतील घटक पक्षांसाठी आजचा महत्वाचा आणि मोठा दिवस आहे. मोदींनी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
PM Modi Oath Ceremony
PM Modi Oath Ceremony Agrowon

Pune News : भाजप, नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीएतील घटक पक्षांसाठी आजचा महत्वाचा आणि मोठा दिवस आहे. मोदींनी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून रविवारी (ता.०९) सायंकाळी ७.२५ वाजता राष्ट्रपती भवनात शपथ घेतली. मोदींना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी पद आणि गोपनियनेची शपथ दिली. त्यावेळी मोदींसह ३० जणांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामध्ये राज्यातून नितीन गडकरी, पीयूष गोयल यांचा समावेश आहे. तसेच शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांनी राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) म्हणून शपथ घेतली. तर केंद्रीय राज्यमंत्री म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले, रक्षा खडसे आणि मुरलीधर माहोल यांनी शपथ घेतली. मोदी यांच्या या भव्य दिव्य शपथविधी सोहळ्याला जगभरातील दिग्गज नेत्यांसह महत्त्वपूर्ण अशा ८ हजार व्यक्तिंची उपस्थिती होती. तसेच या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार म्हणून स्वच्छता कर्मचारी आणि मजूरही उपस्थित होते. मोदी यांनी देशाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी बरोबरी केली आहे.

महत्वाचे पंतप्रधान आणि मान्यवर

श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती डॉ.मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफिफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंदकुमार जुगनाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक देशांचे राजदूत आणि उच्चायुक्तांसह चित्रपट क्षेत्रातील अक्षय कुमार, शाहरुख खान उपस्थित होते. तसेच उद्योग क्षेत्रातील रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्यासह अनेक मान्यवरांची शपथविधील हजेरी होती.

उराशी बाळगलेले स्वप्न आता पूर्ण होईल : शिंदे

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर दिली. शिंदे यांनी, भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानी नेण्याचे उराशी बाळगलेले स्वप्न आता पूर्ण होईल, ही खात्री असल्याचे म्हटले आहे. तसेच बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो! गेले दहा वर्षे व्रतस्थपणे देशाच्या कल्याणासाठी दिवसरात्र झटणारे, जागतिक पातळीवर भारताला मोठा सन्मान मिळवून देणारे आणि अहोरात्र गरिबांच्या कल्याणाचा ध्यास घेतलेले भारताचे भाग्यविधाते, विश्वगुरू नरेंद्र मोदी जी यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नवा भारत, श्रेष्ठ भारत घडवण्यासाठी त्यांच्या प्रयत्नात आम्ही भक्कम साथ देणार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर मोदीजींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार देशाला नव्या उंचीवर नेऊन ठेवेल, असा विश्वास मला वाटत असल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे.

PM Modi Oath Ceremony
PM Modi Oath Ceremony : पंतप्रधान मोदींचा शनिवारी शपथविधी?

खर्गे यांचीही उपस्थिती

मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत असल्याने जगभरातील प्रमुख आणि मान्यवर दिल्लीत दाखल झाले. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण देण्यात आले होते. ते सोहळ्याला जातात की नाही याकडे अनेकांचे लक्ष लागले असतानाच खर्गे यांनी पक्ष आणि सहकाऱ्यांशी चर्चा करून सोहळ्याला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. तसेच खर्गे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून शपथविधीमध्ये सहभागी होणार आहेत.

आजच्या होणाऱ्या शपथविधीत मोदी यांच्यासह तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) आणि जनता दल (युनायटेड) किंवा जनता दल (सेक्युलर) चे प्रत्येकी दोन सदस्य आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) इतर आठ घटक पक्षांचा प्रत्येकी एक सदस्याचा शपथविधी पार पडला. देशभरातील ७१ खासदारांना पंतप्रधान कार्यालयातून औपचारिकरित्या शपथ ग्रहण समारंभासाठी निमंत्रण देण्यात आले होते.

यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ :

(१) राजनाथ सिंह (BJP) (२) अमित शाह (BJP) (३) नितीन गडकरी (BJP) (४) जगत प्रकाश नड्डा (BJP) (५) शिवराज सिंह चौहान (BJP) (६) निर्मला सीतारमन (BJP) (७) डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर (BJP) (८) मनोहरलाल खट्टर (BJP) (९) एचडी कुमारस्वामी (जनता दल सेक्युलर) (१०) पीयूष गोयल (BJP) (११) धर्मेंद्र प्रधान (BJP) (१२) जीतनराम मांझी (हिंदुस्थानी अवाम मोर्चा) (१३) लल्लन सिंह (जदयू) (१४) सर्वानंद सोनोवाल (BJP) (१५) डॉ. वीरेंद्र कुमार (BJP) (१६) राम मोहन नायडू (तेलुगू देसम पक्ष) (१७) प्रल्हाद जोशी (BJP) (१८) जुएल उरांव (BJP) (१९) गिरीराज सिंह (BJP) (२०) अश्विनी वैष्णव (BJP) (२१) ज्योतिरादित्य सिंधिया (BJP) (२२) भूपेंद्र यादव (BJP) (२३) गजेंद्र सिंह शेखावत (BJP) (२४) अन्नपूर्णा देवी (BJP) (२५) किरण रिजिजू (BJP) (२६) हरदीप सिंह पुरी (BJP) (२७) डॉ. मनसुख मांडविया (BJP) (२८) जी किशन रेड्डी (BJP) (२९) चिराग पासवान (लोक जनशक्ती पार्टी) (३०) चंद्रकांत पाटील (BJP)

PM Modi Oath Ceremony
PM Modi : मोदींनी राष्ट्रपतींकडे सोपवला राजीनामा, १७वी लोकसभा विसर्जित होणार

या नेत्यांनी घेतली केंद्रीय राज्य मंत्री (स्वतंत्र पदभार) पदाची शपथ

(१) राव इंद्रजीत सिंह (२) जितेंद्र सिंह (३) अर्जुन राम मेघवाल (४) प्रतापराव जाधव (शिवसेना शिंदे गट) (५) जयंत चौधरी (राष्ट्रीय लोकदल)

या नेत्यांनी घेतली केंद्रीय राज्य मंत्री पदाची शपथ

(१) जितिन प्रसाद (२) श्रीपाद नाईक (३) पंकज चौधरी (४) कृष्णपाल गुर्जर (५) रामदास आठवले (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) (६) रामनाथ ठाकूर (जदयू) (७) नित्यानंद राय (८) अनुप्रिया पटेल (अपना दल (सोनेलाल)) (९) व्ही. सोमन्ना (१०) चंद्रशेखर पेम्मासानी (तेलुगू देसम पक्ष) (११) प्रा. एस. पी. सिंह बघेल (१२) शोभा करंदलाजे (१३) कीर्तिवर्धन सिंह (१४) बी. एल. वर्मा (१५) शंतनू ठाकुर (१६) सुरेश गोपी (१७) एल. मुरूगन (१८) अजय टम्टा (१९) बंडी संजय (२०) कमलेश पासवान (२१) भागीरथ चौधरी (२२) सतिशचंद्र दुबे (२३) संजय शेठ (२४) रवनीत सिंह बिट्टू (२५) दुर्गादास उइके (२६) रक्षा खडसे (२७) सुकांता मजुमदार (२८) श्रीमती सावित्री ठाकूर (२९) तोखन सोहू (३०) डॉ. राजभूषण चौधरी (३१) भूपती राजू श्रीनिवास वर्मा (३२) हर्ष मल्होत्रा (३३) निमुबेन बांभनिया (३४) मुरलीधर मोहोळ (३५) जॉर्ज कुरियन (३६) पवित्र मार्गेरिटा

युद्धस्मारक, अटल स्मारक आणि राजघाट

नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेण्याआधी युद्ध स्मारकावर जाऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी त्यांच्यासोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित होते. याचबरोबर मोदींनी दिल्लीतील अटल स्मारक येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली. तसेच शपथविधी सोहळ्यापूर्वी मोदी यांनी राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.

या महिला खासदार झाल्या मंत्री

देशात मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत अनेक नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात काही महिला खासदारांचाही समावेश आहे. निर्मला सीतारामन आणि अनुप्रिया पटेल यांना पीएम मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळणार आहे. तर खासदार शोभा करंदलाजे, खासदार अन्नपूर्णा देवी, श्रीमती सावित्री ठाकूर, महाराष्ट्रातून रावेरच्या भाजप खासदार रक्षा खडसे यांच्यासह खासदार निमुबेन बांभनिया यांची मोदी सरकार ३.० मध्ये मंत्री म्हणून वर्णी लागणार आहे.

PM Modi Oath Ceremony
PM Narendra Modi : शेतकऱ्यांचा आशीर्वाद मागण्यासाठी आलेल्या मोदींचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीकडे कानाडोळा

नेहरू यांच्याशी बरोबरी

नरेंद्र मोदी यांनी रविवारी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. मोदी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तिसऱ्यांदा शपथ घेणारे तिसरे नेते ठरले आहेत. मोदी यांच्या आधी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे १९९६ मध्ये १९ दिवस, १९९८-९९ मध्ये १३ महिने आणि १९९९ ते २००४ पर्यंत पुर्ण पाच वर्षे असे पंतप्रधान पद सांभाळले. नेहरूंनी १०९२, १९५७ आणि १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुका जिंकत देशाचे पंतप्रधान होण्याचा मान मिळवला होता.

महाराष्ट्रातून या चेहऱ्यांना मिळाली संधी

मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असून महाराष्ट्रातून कोणाला संधी मिळणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. दरम्यान भाजप नेते खासदार नितीन गडकरी, पियुष गोयल, रक्षा खडसे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले आणि शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार प्रतापराव जाधव यांची मंत्रीपदी नियुक्ती झाली. तसेच पहिल्यांदाचम पुणे शहरातून खासदार झालेले मुरलीधर माहोल यांना देखील राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

‘नो फ्लाईंग’ झोन घोषित

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी दरम्यान दिल्लीत तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे राजधानी दिल्लीला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होते. राजधानी दिल्लीत काही निर्बंध लागू करण्यात आले होते. येथे ‘नो फ्लाईंग’ झोन घोषित करण्यात आले होते. त्यामुळे दिल्लीत ड्रोन, पॅराग्लायडिंगला बंदी घालण्यात आली होती. तर कलम १४४ लागू करण्यात आले होते. त्याचबरोबर राष्ट्रपती भवन परिसरात अर्धसैन्यदलाच्या पाच कंपन्यांसह एनएसजी कमांडोंसह स्नाईपर देखील तैनात करण्यात आले होते.

भाजपला मित्र पक्षांचा आधार

यंदा भाजपसह मित्र पक्ष असणाऱ्या एनडीएने ४०० पार चा नारा दिला होता. याच नाऱ्यांने त्यांचा घात केला आणि भाजपला आता मित्र पक्षांचा आधार घ्यावा लागत आहे. भाजपला यंदा २४० जागांवर समाधान मानावे लागले असून मित्र पक्षांच्या मदतीने २९३ जागांच्या मदतीने सरकार स्थापनेचा दावा भाजपने केला आहे. टीडीपी १६ आणि जेडीयूच्या १२ खासदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ७ खासदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. तर भाजपच्या विरोधात असणाऱ्या इंडिया आघाडीला २३४ जागांची मजल मारता आली आहे. यंदा काँग्रेस पक्षाला ९९ जागा मिळाल्या असून अपक्ष म्हणून निवडणूक आलेल्या खासदार विशाल पाटील यांनी आपला पाठिंबा काँग्रेसला दिला आहे.

मोदींनी गेल्या २४ वर्षात ६ वेळा घेतली शपथ

नरेंद्र मोदींनी गेल्या २४ वर्षात ६ वेळा वेगवेगळ्या पदाच्या शपथ घेतल्या आहेत. त्यांनी ४ वेळा मुख्यमंत्री आणि २ वेळा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. तर ते आता ७ व्यांदा घेतील. ज्यात पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ असेल. याआधी ७ ऑक्टोंबर २००१, २२ डिसेंबर २००२, २५ डिसेंबर २००७ आणि २६ डिसेंबर २०१२ रोजी मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर २६ मे २०२४, ३० मे २०२९ आणि ९ जून २०२४ रोजी ते पुन्हा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com