PM Narendra Modi : शेतकऱ्यांचा आशीर्वाद मागण्यासाठी आलेल्या मोदींचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीकडे कानाडोळा

PM Narendra Modi Nashik : महायुतीचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी मोदींनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीकडे कानाडोळा करत मोदींनी जय श्रीरामचा नारा दिला...
PM Narendra Modi
PM Narendra ModiAgrowon

Pune News : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाच्या मतदानासाठी काहीच दिवस उरले आहेत. यामुळे राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज ठाकरे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सभांचा जोर वाढला आहे. बुधवारी (ता.१५) मोदी यांची भारती पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने नाशिक येथील पिंपळगाव येथे प्रचाराच सभा झाली. यावेळी मोदी यांनी काँग्रेससह शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षावर निशाणा साधला. पण मोदींनी कांद्याच्या निर्यात बंदीसह कांद्याच्या विषयावर बोलावे अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची होती. यावरून मोदी यांचे भाषण सुरू असतानाच जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्याने मोदींना आपले भाषण मध्येच थांबवावे लागले. तर घोषणा देणाऱ्या शेतकऱ्याला बाहेरचा रस्त्या दाखवण्यात आला. यावरून सध्या राजकारण सुरू झाले आहे.

भाजपच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारासाठी मोदी नाशिकला आले होते. यावेळी त्यांनी आपण येथे शेतकऱ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचे म्हटले. मात्र आशीर्वाद मागणाऱ्या मोदींनी कांदा उत्पादक शेतकऱ्याकडे कानाडोळा केल्याचे दिसून आले आहे. यामुळे येथे नाराजी व्यक्त केली जात आहे.

PM Narendra Modi
PM Narendra Modi : 'माझा पूर्ण फोकस शेतकरी, तरूण, महिला आणि गरीबाच्या सक्षमीकरणावर' : मोदी

आज दिंडोरीत सभा आयोजित करण्यात आली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना ठाकरे गटावर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षावर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीनंत ठाकरे गट आणि शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होईल. ठाकरे गट जेव्हा काँग्रेसमध्ये विलीन होईल, तेव्हा मला बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येईल. त्यांना खूप दु:ख होईल, असा दावा नरेंद्र मोदी यांनी केला. “तुम्ही गेल्या दहा वर्षात माझं काम पाहिलं आहे. आता मी आपल्याकडे आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे. तिसऱ्या कार्यकाळासाठी आशीर्वाद मागण्यासाठी आलोय. विकसित भारतासाठी आशीर्वाद मागण्यासाठी आलोय”, असं नरेंद्र मोदी यांनी जनतेला आवाहन केलं. मात्र त्यांच्याच सभेत प्रश्नावर उत्तर मागणाऱ्या शेतकऱ्याला बाहेर हाकलण्यात आले.

मोदींचे भाषण सुरु असतानाच प्रेक्षकांमध्ये बसलेल्या कांदा उत्पादकांनी "मोदीजी आता कांद्यावर बोला"... कांद्यावर बोला अशी मागणी करत घोषणाबाजी सुरु केली. यामुळे त्यांचे लक्ष विचलित झाले आणि मोदींचे भाषण क्षणभर थांबले. मोदींचे भाषण मध्येच थांबल्याने प्रेक्षकांमध्ये चुळबूळ सुरू झाली.

तसेच घोषणाबाजी करण्याऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे अनेकांच्या नजरा खिळल्या. यावरून पोलिसांनी कांदा उत्पादक तरूणाला ताब्यात घेतलं. यानंतर मोदी-मोदी अशा घोषणाबाजीनंतर जय श्रीरामच्या घोषणा सुरू झाल्या. यामुळे सभेत काहीच झाले नाही असे वातावरण तयार झाले होते.

PM Narendra Modi
Onion Export Issue : मोंदीच्या दौऱ्याआधी लासलगावात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन

दरम्यान, मोदींनीही जय श्रीराम....जय श्रीरामचा नारा देत प्रेक्षकांना प्रत्साहित केले. तसेच आपले भाषण पुन्हा सुरू केले. मात्र मोदींच्या भाषणा वेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची घोषणाबाजी सुरुच होती. यामुळे मोदींना आपले भाषण आवरते घ्यावे लागले.

उत्पादक जगला पाहिजे

यावरून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी खोचक टीका केली आहे. तुपकर यांनी पंतप्रधान मोदी येतात ही चांगली बाब आहे. त्यांनी जय श्रीराम अशी घोषणा ही दिली ही देखील चांगली बाब आहे. तसेच ते कोणती घोषणा देतात यावर आमचा आक्षेप नाही. पण जेव्हा देशाचे पंतप्रधान आपल्या भागात येतात तेव्हा त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे समाधान करायला हवे होते. पण त्यांनी कांदा उत्पादकाला फाट्यावर मारले. त्यांच्याकडे कानाडोळा केला. यामुळे जर असेच सुरू राहिले तर कांदा उत्पादक तुम्हाला जागा दाखवेल असा इशारा दिला आहे.

रोहित पवारांचे ट्वीट

दरम्यान शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी काही तासांपूर्वी ट्विट करुन कांदा उत्पादकांना नोटीसा बजावल्यावरून टीका केली होती. त्यांनी मोदींची नाशिकमध्ये सभा होणार आहे म्हणून कांदा उत्पादकांना पोलिसांनी नोटीसा दिल्या. काहींना तर ताब्यातही घेतले. तर निर्वीवाद सत्ता उपभोगणाऱ्यांनी शेतकरी हिताचे निर्णय घेतले असते तर कदाचित हि वेळ आली नसती, अशीही टीका केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com