Mosambi
MosambiAgrowon

Mosambi Market Rate : छत्रपती संभाजीनगरमध्ये मोसंबी १४०० ते ३२०० रुपये

Mosambi Market Price in Aurangabad : मोसंबीला १४०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान तर सरासरी २३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
Published on

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १८) मोसंबीची ३४ क्विंटल आवक झाली. या मोसंबीला १४०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान तर सरासरी २३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Mosambi
Mosambi Orchard : अनेक वर्षांपासून जोपासली मोसंबी जागेवर तयार केले ‘मार्केट’

छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता. ११) ३४ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीला एक हजार दोनशे ते तीन हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. या दिवशी सरासरी दर २२०० रुपये प्रतिक्विंटल राहिला.

गुरुवारी (ता. १२) १६८ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीचे दर ७०० ते ३१०० प्रतिक्विंटल दरम्यान तर सरासरी दर १९०० प्रतिक्विंटल राहिले. शनिवारी (ता. १४) मोसंबीची आवक ७६ क्विंटल तर दर १२०० ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहिले.

या दिवशी मोसंबीला सरासरी २६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. रविवारी (ता. १५) मोसंबीची आवक ३४ क्विंटल तर दर २००० ते ४५०० प्रतिक्विंटल दरम्यान राहिले. या दिवशी सरासरी दर ३२५० रुपये प्रतिक्विंटल राहिला.

सोमवारी (ता. १६) मोसंबीची आवक ४८ क्विंटल तर दर २००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान तर सरासरी दर २७५० रुपये प्रतिक्विंटल राहिला. मंगळवारी (ता. १७) ४० क्विंटल आवक झालेल्या मोसंबीला २२०० ते ३४०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान तर सरासरी २८०० प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com