नागपुरात संत्रा, मोसंबीचे दर ‘जैसे थे’

नागपूर : मागणीअभावी संत्रा दरात घसरण झाली होती. नंतर मात्र हंगाम अंतीम टप्प्यात आल्याने दरात काहीशी सुधारणा अनुभवली गेली. त्यानुसार संत्रा, मोसंबी दर गेल्या आठवड्यापासून स्थिर आहेत.
 Orange, citrus prices in Nagpur 'as they were'
Orange, citrus prices in Nagpur 'as they were'
Published on
Updated on

नागपूर : मागणीअभावी  संत्रा दरात घसरण झाली होती. नंतर मात्र हंगाम अंतीम टप्प्यात आल्याने दरात काहीशी सुधारणा अनुभवली गेली. त्यानुसार संत्रा, मोसंबी दर गेल्या आठवड्यापासून स्थिर आहेत. कळमना बाजार समितीत १२०० ते १४०० रुपये क्विंटल दराने संत्र्यांचे व्यवहार होत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. मोसंबी दर ३००० ते ३४००  क्विंटल आहेत. 

संत्रा लागवडीखाली विदर्भात सुमारे १ लाख ३४ हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. यावर्षी पावसाची संततधार कायम होती. त्यामुळे संत्र्यावर अपेक्षित रंगधारणा  झाली नाही.  त्यासोबतच देशाच्या इतर भागात देखील पाऊस होता. परिणामी, संत्र्याला मागणी नव्हती. अशा विविध कारणांमुळे कळमना बाजार समितीत संपूर्ण हंगामात घसरण अनुभवली गेली.

आता आंबिया बहराचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे दरात तेजी अनुभवली जात आहे. १२०० ते १४०० रुपये असा दर सद्या संत्र्यांचा आहे. संत्र्याची आवक ५००० क्विंटलवरुन २००० वर आली. या आठवड्यात देखील संत्र्याचे दर स्थिर होते. आवक मात्र गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी होऊन ४००० क्विंटलवर पोहोचली.  

मोसंबी दरही स्थिरावले आहेत.  नोव्हेंबर महिन्यात मोसंबीचे दर ३६०० ते ४ हजार या दरम्यान होते. मोसंबीची आवक एक हजार क्विंटलची होती. या आठवड्यात देखील मोसंबीचे  ३००० ते ३४०० रुपयांवर पोहोचले. आवक वाढून १००० क्विंटलवर पोहोचली आहे. बाजारात द्राक्ष ५००० ते  ६००० क्विंटल होते. आवक ८६ क्विंटल नोंदविण्यात आली. डाळिंबांची आवक ३५० क्विंटल आहे. दर दोन हजार ते सहा हजार असे राहिले. बाजारात बटाट्याची २८७३ क्विंटल आवक झाली. बटाट्याचे दर २५०० ते ३५०० रुपयांवरुन १४०० ते २००० रुपयांपर्यंत खाली आली. 

कांदा दरात काहीशी घसरण नोंद झाली.  पांढरा कांदा ३००० ते ४००० रुपये क्विंटल होता.  या आठवड्यात कांदा दर २२०० ते  २८०० रुपये झाले. लसणाची आवक ८७२ क्विंटल असून ५००० ते १०००० रुपये असा दर मिळाला. लसून दरात चांगली तेजी आली आहे. आल्याची बाजारातील आवक वाढली.  ती १००० क्विंटल होती. 

हरभऱ्यास ४००० ते ४३०० रुपये दर

हरभऱ्याची आवक १२ क्विंटल होती. त्यास ४००० ते ४३०० रुपये दर मिळाला. सोयाबीनचे व्यवहार ४००० ते ४३५० रुपयांनी झाले. आवक वाढली  असून गेल्या आठवड्यात ७६२ क्विंटल, या आठवड्यात  ५८९ क्विंटलवर आवक झाली. भुईमूग शेंगाचे व्यवहार ४००० ते ४३०० रुपये क्विंटलने झाले. मूगाची आवक अवघी ७ क्विंटल आहे. मूंग दर ५५०० ते ५७०० क्विंटल होते.  गव्हाचे दर २४०० ते २८०० रुपये होते. आवक ११७ क्विंटलची झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com