Manikrao Kokate News : रमी प्रकरण, पिकविमा, ढेकळाचे पंचनाम्यावर कृषिमंत्री कोकाटेंचं स्पष्टीकरण

Agriculture Minister : राज्यातील शेतकरी संकटात सापडलेला आहे. परंतु कृषिमंत्री अधिवेशनादरम्यान विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळत असल्याचा व्हिडीओ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी रविवारी प्रसिद्ध केला. त्यावरून कृषिमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वच स्तरातून केली गेली.
Agriculture Minister
Agriculture Minister Agrowon
Published on
Updated on

Rummy Video Manikrao Kokate: राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळण्याचे आरोप मंगळवारी (ता.२२) फेटाळले आहेत. नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत कृषिमंत्र्यांनी विरोधकांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे कृषिमंत्र्यांचं रमी प्रकरण पुढे तापण्याची शक्यता आहे.

राज्यातील शेतकरी संकटात सापडलेला आहे. परंतु कृषिमंत्री अधिवेशनादरम्यान विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळत असल्याचा व्हिडीओ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी रविवारी प्रसिद्ध केला. त्यावरून कृषिमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वच स्तरातून केली गेली. त्यातच लातूर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अंगावर पत्ते फेकल्याचा आरोप करत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्षाना बेदम मारहाण केली. त्यामुळे तर प्रकरण अधिक चिघळलं.

या प्रकरणात अजित पवारांनी सुरज चव्हाण यांचा राजीनामा घेण्याचे रविवारी आदेश दिले. तर कृषिमंत्र्यांच्या रमी खेळण्याचा प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे वारंवार वादग्रस्त विधानांसह आता रमी प्रकरणामुळे कृषिमंत्री कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत कृषिमंत्री कोकाटे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच वादग्रस्त विधानांवर स्पष्टीकरण दिलं आहे.

Agriculture Minister
Manikrao Kokate Viral Video : राज्यातील शेतकऱ्यांनो, विसरा हमी, खेळा रमी

ढेकळाचे पंचनामे

ढेकळांचा अर्थच कळत नाही, तर मिडियात बदनामी का करता? असा सवाल विरोधकांना कृषिमंत्री कोकाटे यांनी केला आहे. "पिक काढणी प्रयोग संपला की, शेताला नांगरणी करावी लागते. बागायत जमीन असेल तर नांगरट केलेल्या जमिनीत मोठमोठाले ढेपलं बाहेर येतात. जशी असेल त्यावर अवलंबून असते.

आता ज्या शेतीत काहीच नाही, पिकाची पूर्ण काढणी झाली आहे. त्या शेतीत पिक उभं नाहीच, त्या शेतीचे पंचानामे कसे करायचे? शेतीचे पंचनामे होत नाहीत पिकाचे पंचनामे होतात. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे, त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेली आहे, ज्या पिकाचं काढणीनंतर साठवणुकीला जागा नसल्यामुळे पावसात नुकसान होईल त्यांचे पंचनामे करून भरपाई देण्यात येईल, अशी घोषणा मी केली होती." असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

Agriculture Minister
Crop Insurance Scheme : खरीप पीकविमा योजनेला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद

पिकविमा एक रुपया

एक रुपया भिकारी घेत नाही, या विधानामुळे कृषिमंत्री कोकाटे यांच्यावर टीका झाली होती. कृषिमंत्र्यांनी त्यावरही स्पष्टीकरण दिलं आहे. "शेतकऱ्यांकडून एक रुपया शासन घेतं. शेतकऱ्यांना एक रुपया देत नाहीत आम्ही. म्हणजे भिकारी शासन आहे, शेतकरी नाही. त्याचा अर्थ उलटा केला. त्यामुळे एक रुपया किंमत फारच थोडी आहे. एक रुपया विम्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाच ते साडेपाच लाख बोगस अर्ज सापडले. मी ते अर्ज तत्काळ रद्द केले." असेही कृषिमंत्री म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com