Solapur Lumpy Virus : लम्पीच्या भीतीने जनावरांना घातलं PPE कीट; सोलापूरातील शेतकऱ्याने लढवली शक्कल

Lumpy Skin Disease in Solapur : राज्यात लम्पीचा संसर्ग रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभाग अलर्ट झाले. सोलापूरात जनावरांना लम्पीपासून संरक्षणाचे धडे दिले जात आहेत.
Lumpy Virus
Lumpy VirusAgrowon

Solapur News : लम्पी व्हायरस, हा एक असा शब्द आहे जो सध्या देशभरातील शेतकऱ्यांसाठी भीतीचे दुसरे नाव आहे. महाराष्ट्रातही या विषाणूमुळे हजारो जनावरांनी आपला जीव गमवावा लागला असून लाखो जनावरांना त्याचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभाग अर्लट झाले असून जनावरांचा बाजार आणि जनावरांच्या वाहतुकीवर निर्बंध आले आहे.

अशा परिस्थितीत आपल्या लाडक्या जनावरांना लम्पीपासून वाचवण्यासाठी अनोख्या पद्धतींचा अवलंब करत आहेत. सोलापूरमधील एका शेतकऱ्यांने गाईला पीपीई किट घातल्याचे दिसून येत आहे. यामध्ये तिचे संपूर्ण शरीर झाकल्याचे दिसत आहे.

Lumpy Virus
Lumpy Virus : लम्पी स्कीनमुळे १५ दिवसांत ४२ हजार पशूधन बाधित ; तर ९०० जनावारांचा मृत्यू

मागील काही महिन्यांपासून राज्यातील विविध भागात लम्पी संसर्गाची (Lumpy Skin Disease)हजारो जनावरांना संसर्ग झाला. सोलापूर जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासनानेवतीने लसीकरण मोहिम हाती घेतली आहे.

त्याचबरोबर जनवारांची वाहतूक आणि बाजारवर निर्बंध घातले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपल्या जनावरांना लम्पीचा धोका टाळून संसर्ग रोखण्यासाठी सांगोला तालुक्यातील महूद येथील जितेंद्र बाजारे यांनी जनावरांसाठी आता पीपीई किट (PPE Kit) बनवली आहे.

Lumpy Virus
Lumpy Virus : लम्पीपासून वाचण्यासाठी जनावरांचे तातडीने लसीकरण करुन घ्यावे ; आस्तिककुमार पाण्डेय

जितेंद्र बाजारे यांनी हे पीपीई अतिशय कमी किमतीत बनवले असून त्यासाठी कॉटन कापडाचा वापर केला आहे. या कापडाची जाडी 90 जीएसएम नॉन ओवन फॅब्रिक घेऊन काही विशिष्ट ठिकाणी कप्पे करून त्यात डांबर गोळ्या ठेवता येतात.

हे किट बनवण्यासाठी साधारण १५०० रुपये खर्च येत असून त्यामुळे त्यांच्या गोठ्यातील जनावरांना लम्पीच्या संसर्गापासून वाचवणे शक्य होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com