Pune News : लम्पी स्कीन आजाराचा फैलाव राज्यात वेगाने वाढत असून, गेल्या १५ दिवसांत तब्बल ४२ हजार ७८४ पशुधन बाधित झाले असून, मृतांची संख्या ९७३ ने वाढली आहेत. तर एप्रिल ते सप्टेंबर (३ सप्टेंबर अखेर) या पाच महिन्यांमध्ये तब्बल ५५ हजार ५८ पशुधन बाधित झाले असून, त्यापैकी ४ हजार ६३० पशुधन मृत झाले असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून देण्यात आली. तर सर्वाधिक मृत पशुधनाची संख्या ही कोल्हापूर जिल्ह्यात ७५२ एवढी आहे.
राज्यात गेल्या पाच महिन्यांपासून लम्पी स्कीन आजाराचा फैलाव सुरू झाला आहे. फैलाव वेळीच रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने तातडीने लसीकरण मोहीम हाती घेतली. मात्र या लसीचा परिणाम होताना दिसत नसल्याचे समोर येत असून, लम्पीचा नवीन व्हेरियंट तयार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, त्यावर संशोधन देखील सुरू झाले आहे.
यासाठी विविध पशुसंवर्धन महाविद्यालयातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ, संशोधक यांच्याकडून बाधित आणि लसीकरण केलेल्या पशुधनाच्या रक्ताचे नमुने राष्ट्रीय विषाणूजन्य आजार संशोधन संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत.
दरम्यान राज्यातील सुमारे १ कोटी ३९ लाख ९२ हजार ३०४ गोवर्गीय पशुधनापैकी १ कोटी ३७ लाख ४ हजार ९७० पशुधनाला म्हणजेच ९७ टक्के पशुधनाला लसीकरण करण्यात आले आहे. सध्या वारसांना लसीकरणावर भर देण्यात आला असून, गाभण गाईंची संख्या लक्षात घेऊन, व्यायल्यानंतर येणाऱ्या वासरांना लसीकरणाला प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी लसमात्रा प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त हेमंत वसेकर यांनी सांगितले.
जिल्हा --- बाधित --- मृत
कोल्हापूर --- ९ हजार ३४ --- ७५२
सोलापूर --- ५ हजार ७२५ --- ५५१
नांदेड --- ४ हजार २०६ --- ५७५
बीड -- ३ हजार ९१५ --- ३८७
लातूर --- २ हजार ८८१ --- ३६२
सांगली --- ४ हजार ४८८ --- ३१२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.