Team Agrowon
राज्यात जनावरांमधील लम्पी स्कीन आजाराने (Lumpy Skin Disease) थैमान घातले आहे. परिणामी राज्यातील पशुपालक आणि दूध उत्पादक (Milk Producers) चिंतेत आहेत.
किसान सभेने या मागण्यां संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पशुधन मंत्री व कृषीमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.
किसान सभेच डॉ अशोक ढवळे, जे पी गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ अजित नवले यांच्यावतीने सदर निवेदन देण्यात आले.
तसेच पशुधन विकास विभाग, महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या समन्वयाने तालुकास्तरावर कृती दल गठीत करून प्रतिबंध व उपचार या दोन्ही पातळीवर काम करावे.
आणि लम्पी आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या भागांमध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती करावी. शेतकऱ्यांमध्ये विशेष जनजागृती करण्यासाठी तातडीने मनुष्यबळ तैनात करावे अशा मागण्या किसान सभा करत आहे.
जनावरांमध्ये वेगाने पसरणाऱ्या लम्पी स्किन आजाराने राज्यातील पशुधनाला विळखा घातला आहे. लम्पी हा संसर्गजन्य आजार असल्याने राज्यातील पशुधन व दुग्ध व्यवसाय या आजारामुळे धोक्यात आला आहे.
राज्य सरकारने लम्पी प्रभावित भागाला 'नियंत्रित क्षेत्र' म्हणून घोषित केले आहे. जनावरांची नियंत्रित क्षेत्रात किंवा त्या क्षेत्राबाहेर ने-आण करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.