

Mumbai News : सध्या हिवाळ्याचा महिना सुरू असून डहाणू तालुक्यातील कासा ग्रामीण भागात अनेक शेतकरी पालेभाज्या, फळभाज्या लागवड करत आहे. या भाज्या विकून ते उदरनिर्वाह करत आहेत.
पूर्वी फक्त भातपिकाशिवाय कोणतेही उत्पन्न घेतले जात नव्हते. पण सध्या कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने अनेक गाव-खेड्यांतील लहान शेतकरीही पालेभाज्या, फळभाज्यांची लागवड करत ते विकून आपल्या संसाराला हातभार लावत आहेत.
कासा, सायवन, थेरोंडा, ओसरवीरा, कांदर वाडी, धरमपूर, वांगर्ज या परिसरात अनेक शेतकरी अशी लागवड करत आहेत. यामध्ये मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक, दुधी, कारली, काकडी, टोमॅटो, चवळी, तूर, भेंडी, मुळा इत्यादी गावरान ताजी भाजी बाजारात विकत आहेत. बहुतेक भाज्या वाट्यावर, जुडीवर विकल्या जात आहेत.
२० रुपये वाटा, जुडीप्रमाणे नागरिक खरेदी करत आहेत. गाव, खेड्यातून आदिवासी महिला पाच ते आठ किलोमीटर अंतरावरून डोक्यावर टोपली घेऊन कासा, चारोटी बाजारपेठेत विक्री करण्यासाठी बसत आहेत. सकाळी ६ वाजल्यापासून दुपारी १ पर्यंत आणलेल्या भाज्या विकून पुन्हा घरी परतत आहेत. येथील अनेक कृषी केंद्रचालक विविध भाज्या, फळ यांची तयार रोपे विकण्यास आणतात. सर्व प्रकारचे कृषी सामान, खते, व इतर साहित्य मिळत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.