Strawberry Market : वाशी बाजारपेठेत स्‍ट्रॉबेरीची गोडी

Market Update : वाशीतील मुंबई कृषी उत्‍पन्न बाजार समितीत स्‍ट्रॉबेरी दाखल झाली आहेत. आवक वाढल्‍याने किमतीत घट झाली असून मार्केटमध्ये येणारे ग्राहक आवर्जून स्‍ट्रॉबेरी खरेदी करत आहेत.
Vashi Market
Vashi MarketAgrowon
Published on
Updated on

Vashi News : वाशीतील मुंबई कृषी उत्‍पन्न बाजार समितीत स्‍ट्रॉबेरी दाखल झाली आहेत. आवक वाढल्‍याने किमतीत घट झाली असून मार्केटमध्ये येणारे ग्राहक आवर्जून स्‍ट्रॉबेरी खरेदी करत आहेत. त्‍याचसोबत थंडीमध्ये खाल्ली जाणारी काळी द्राक्षेही दाखल झाली आहेत.

अवकाळी पावसाच्या फटक्यानंतरही नवी मुंबई बाजारपेठेत मुबलक प्रमाणात स्ट्रॉबेरी उपलब्‍ध आहे. घाऊक बाजारात स्ट्रॉबेरीची किंमत प्रतिकिलो ४० ते १०० रुपये आकार आणि गुवत्तेनुसार आकारली जात आहे.

Vashi Market
Strawberry Market : महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी पेणमध्ये दाखल

घाऊक बाजाराच्या किमतीपेक्षा किरकोळ बाजारात स्ट्रॉबेरीची किंमत जास्त मोजावी लागत असून किलोमागे ८० ते १५० रुपये असा दर आहे. दरदिवशी बाजारात ५० ते ७० टन स्ट्रॉबेरी येत असून ही आवक वाढण्याची शक्यता आहे. परिणामी स्ट्रॉबेरीच्या किमतीमध्ये येत्या काळात आणखी घट होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

राज्‍यात थंडी वाढल्याने स्ट्रॉबेरीसह द्राक्षांनाही पोषक वातावरण निर्माण झाले आहे. बाजारात द्राक्षांच्या शरद सीडलेस, जम्बो, जेट्टी आणि कृष्णा अशा चार जाती उपलब्ध अाहेत. अवकाळी पावसाचा उत्पादनावर काही प्रमाणात परिणाम जाणवत असला, तरीही द्राक्षे लवकर काढल्याने शेतकऱ्यांचे नुकसान काही प्रमाणात टळले आहे.

Vashi Market
Strawberry Cluster : महाबळेश्‍वरच्या धर्तीवर भीमाशंकरला ‘स्ट्रॉबेरी क्लस्टर’

बाजारात काळ्या द्राक्षांची आवक चांगली असून दिवसाला ४० ते ५० गाड्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत येत आहेत. मात्र त्‍या तुलनेत उठाव होत नसल्याने सध्या द्राक्षांचे भाव कमी आहेत.

असे आहेत दर...

स्‍ट्रॉबेरी - घाऊक बाजार - प्रतिकिलो ४० ते १०० रुपये

किरकोळ बाजार - प्रतिकिलो ८० ते १५० रुपये

द्राक्षे - जम्बो, कृष्णा द्राक्षे ः प्रतिकिलो ७० ते १०० रुपये

इतर द्राक्षे ः प्रतिकिलो ४० ते ५० रुपये

अवकाळी पावसाचा फटका सर्वच पिकांना बसला आहे. पिकांच्या उत्पन्नावर आणि गुणवत्तेवर याचा परिणाम जाणवत आहे. बाजारात आवक समाधानकारक होत असल्याने व्यापारी निश्चिंत आहेत.
संतोष चव्हाण, व्यापारी
मालाच्या उत्पादनावर होणारा खर्च आणि विक्रीचा दर यात अधिक फरक नसल्याने महागाईचा फटका लहान शेतकऱ्यांना बसत आहे. खतांचे भाव वाढल्याने शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम होत आहे.
राजू मुरकुटे, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com