Vegetable Farming : आधुनिक पद्धतीने पिकविलेल्या भाज्याही तितक्याच चविष्ट!

Vegetable Verticle Farming : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने उत्पादित केलेल्या भाजीपाला किंवा अन्नाच्या चवीबाबत सामाजिक पातळीवर एक पूर्वग्रह दूषित असतो.
Vegetable Farming
Vegetable FarmingAgrowon
Published on
Updated on

Vegetable Production : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने उत्पादित केलेल्या भाजीपाला किंवा अन्नाच्या चवीबाबत सामाजिक पातळीवर एक पूर्वग्रह दूषित असतो. त्यांची चव ही पारंपरिक शेतीइतकी किंवा सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या उत्पादनाइतकी नसल्याचा दावा अनेक जण करत असतात.

मात्र कोपनहेगन विद्यापीठामध्ये शास्त्रीय पद्धतीने घेतलेल्या चव चाचण्यांमध्ये या अन्नांच्या चवीमध्ये ओळखण्याइतका कोणताही फरक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अभ्यासाचे हे निष्कर्ष ‘फूड क्वालिटी अॅण्ड प्रेफरन्सेस’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

व्हर्टिकल फार्मिंग ही शहरी भागात केली जाणारी पर्यायी शेती आहे. त्यात एखाद्या बंदिस्त जागेमध्ये संपू्र्ण नियंत्रित वातावरण, कृत्रिम प्रकाश, मातीरहित पाणी किंवा अन्य माध्यमांमध्ये एकावर एक अशा उभ्या पद्धतीने प्रामुख्याने भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. यात अत्यंत कमी जागेमध्ये अधिक उत्पादन घेणे शक्य होते. अशा प्रकारे शहरामध्ये आणि पूर्ण वर्षभर उत्पादित केलेल्या भाज्यांमुळे विविध नैसर्गिक स्रोतांसह वाहतुकीवरील ताण कमी होत आहे.

भविष्यातील जागेची कमतरता आणि वाढती लोकसंख्येचा ताण या बाबी लक्षात घेता भविष्यात अत्याधुनिक शेतीकडे वळण्याशिवाय पर्याय राहणार नाही. मात्र जगभरातील लोकांच्या मनामध्ये उभ्या पद्धतीने उत्पादित केलेल्या भाज्यांबद्दल पूर्वग्रह आहेत. अन्य लोकांसोबत सामान्य डच ग्राहकही या भाज्यांची सपक, पचपचीत आणि कृत्रिम या शब्दांनी अवहेलना करताना दिसतात. त्यांचे म्हणजे खरे आहे, किंवा पूर्वग्रह आहे, यासाठी कोपनहेगन विद्यापीठातील अन्नशास्त्र विभागातील संशोधकांनी अभ्यास केला. त्यांनी १९० सहभागी लोकांचे डोळे बांधून चव घेऊन पदार्थाला चवीनुसार १ ते ९ गुण देण्यास सांगितले.

यामध्ये रॉकेट अर्गुला (सामान्यतः त्याला सॅलड गार्गर नावाने ओळखतात.), कोवळा पालक (बेबी स्पिनॅच), वाटाण्याचे अंकुर, पार्सेली या भाज्यांचा समावेश होता. या प्रयोगामध्ये मातीरहित पूर्णपणे कृत्रिम आणि उभ्या (व्हर्टिकल) पद्धतीच्या शेतीतील हिरव्या भाजी उत्पादनासोबत पारंपरिक आणि सेंद्रिय उत्पादनांचाही समावेश होता.
त्याविषयी माहिती देताना सहयोगी प्रोफेसर मायकेल बोम फ्रॉस्ट यांनी सांगितले, की चवीबाबत आपण सर्वजण विनाकारण संशयवादी असतो. त्यातही जुन्या काळातील पारंपरिक किंवा सेंद्रिय पद्धतीच्या उत्पादनाबाबत ते चांगले असल्याचा आपला दावा असतो. पण आम्ही केलेल्या चाचणीमध्ये डोळे झाकलेले असताना सहभागी व्यक्तींना सेंद्रिय, पारंपरिक किंवा कृत्रिम व्हर्टिकल पद्धतीच्या उत्पादनामध्ये फारसा फरक करता आला नाही. याचाच अर्थ त्या सर्वांना सेंद्रिय आणि अन्य सर्व उत्पादनांची चव एकसारखीच लागली.

Vegetable Farming
Orange Plantation : आधुनिक पद्धतीने करा संत्रा लागवड

चवीची काट्यांची शर्यत...
भाज्यांच्या चवीची ही काट्यांची शर्यत होती. त्यात सेंद्रिय उत्पादनांनी फारच कमी मतांनी आघाडी घेतली. उदा. वाफवलेल्या रॉकेट अर्गुला या भाज्यांसाठी सर्वाधिक चांगल्या चवीची म्हणून एक ते नऊपैकी नऊ गुण दिले असले तरी दोन्ही पद्धतींच्या एकूण रॉकेट अर्गुलाच्या सॅलडने ६.६ गुण मिळवले.

त्याच प्रमाणे बेबी स्पिनॅच आणि बेसिलच्या दोन जातींमध्येही अशीच काट्याची स्पर्धा राहिली. वाटाणा अंकुराच्या बाबतीत तर दोन वेळा चाचण्या करण्यात आल्या, त्यात दोन्ही वेळा वेगळे विजेते मिळाले. या सर्वांमध्ये फक्त एकच विजेता ठरली ती म्हणजे सेंद्रिय पद्धतीने वाढवलेली पार्सेली.

Vegetable Farming
Vegetable Farming : कसं असाव वेलवर्गीय भाजीपाला लागवडीच नियोजन?

या पूर्वीच्या अभ्यासामध्ये ग्राहकांनी व्हर्टिकल फार्मिंगद्वारे उत्पादित भाज्यांबाबत असलेल्या पूर्वग्रह उघड झाला होता. मात्र तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भात ग्राहक सकारात्मक होत असून, त्यांच्या या उत्पादनाकडून फारच कमी अपेक्षा असतात. त्यामुळे या हिरव्या भाज्या आणि औषधी वनस्पतींसाठी कल दाखवलेला जात असला, तरी या भाज्या नैसर्गिक आणि आरोग्यवर्धक असल्याचेही ते मानत नाहीत.

अर्थात, हा नैसर्गिकतेचा पूर्वग्रह असल्याचे फ्रॉस्ट सांगतात. ते पुढे म्हणाले, की हे नावीन्यांच्या भीतीचे (निओफोबिया) रास्त उदाहरण आहे. त्याचे प्रमाण आपल्यापैकी प्रत्येकामध्ये कमी अधिक असू शकते. नवीन गोष्टींची चव पाहण्याबाबत काही ग्राहक एकदमच नाखुश असतात. हाच नव्या तंत्रज्ञानाच्या स्वीकारातील सर्वांत मोठा अडथळा ठरू शकतो. त्यावर मात करण्यासाठी योग्य माहिती आणि ग्राहकांचे सतत शिक्षण याच बाबीत महत्त्वाच्या ठरू शकतात.

अभ्यासाच्या मुख्य लेखक सारा जाईगेर यांनी सांगितले, की अत्याधुनिक पद्धतीच्या शेतीचे अनेक फायदे असले, तरी त्याचा ग्राहकाकडून स्वीकार होण्याचीही आवश्यकता आहे. भविष्यातील एकूणच मानव जातीच्या अन्नसुरक्षेच्या दृष्टीने नव्या तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरणार आहे. आजवरच्या मानवाच्या इतिहासामध्ये तंत्रज्ञानाच्या शोधांमुळेच माणसाच्या ताटामध्ये अन्न उपलब्ध होऊ शकले आहे.

निष्कर्ष -
दोन गटांमध्ये केलेल्या चाचणीचा तक्ता
चाचणी पहिली

भाजी --- उभी कृत्रिम शेती (व्हर्टिकल फार्मिंग) --- सेंद्रिय शेती --- निर्णय
बेबी स्पिनॅच (कोवळा पालक) --- ६.१ --- ६.२ --- अनिर्णित
बेसिल --- ५.९ --- ६.२ --- अनिर्णित
वाटाणा अंकूर --- ७.८ --- ६.९ --- व्हर्टिकल फार्म जिंकले.
रॉकेट अर्गुला --- ७.२ --- ७.५ अनिर्णित

चाचणी दुसरी
पार्सेली --- ५.६ --- ६.८ --- सेंद्रिय विजेते.
बेसिल --- ५.९ --- ६.४ --- अनिर्णित
वाटाणा अंकुर --- ६.६ --- ७.५ --- सेंद्रिय विजेते.
रॉकेट अर्गुला --- ६.६ --- ६.६ --- अनिर्णित

या अभ्यासामध्ये इंग्रजी, जर्मन आणि डॅनिश अशा तिन्ही ग्राहकांचा समावेश होता.
पहिल्या चाचणीमध्ये व्हर्टिकल फार्मिंगमध्ये उत्पादित भाज्यांची तुलना सेंद्रिय भाज्यांशी केली होती. दुसऱ्या चाचणीमध्ये उलटे केले होते.
यामध्ये सहभागी १९० व्यक्तींनी भाज्यांची चव, दिसणे आणि अन्य संवेदक बाबींनुसार चाचणीमध्ये मार्क दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com