Temple Land Donation: शेख मस्तान यांच्याकडून मंदिरासाठी जमीन दान

Sheikh Mastan Sheikh Roshan: माळकिन्ही (ता. महागाव) गावच्या शेख मस्तान शेख रोशन यांनी सामाजिक सलोख्याचा अनोखा आदर्श समोर ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी मंदिरासाठी आपली एक एकर जागा दान केली आहे.
Sheikh Mastan Sheikh Roshan
Sheikh Mastan Sheikh RoshanAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News: गुंठ्यातील शेती, घर किंवा जागांचे भावकीतील वाद सर्वश्रुत आहेत. या वादातून अनेक कुटुंबांतील सदस्यांना जीवही गमवावे लागले आहेत. त्याचबरोबरीने जातीय राजकारणातून घडणाऱ्या दंगली आणि त्यात जाणारा सामान्यांचा बळी असे वास्तव आहे. एकीकडे समाजात हे घडत असतानाच माळकिन्ही (ता. महागाव) गावच्या शेख मस्तान शेख रोशन यांनी सामाजिक सलोख्याचा अनोखा आदर्श समोर ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी मंदिरासाठी आपली एक एकर जागा दान केली आहे.

शेख मस्तान यांची वडिलोपार्जित सहा एकर शेती. त्यांच्यासह कुटुंबात पत्नी, २५ वर्षांचा एक मुलगा आणि चार मुली असा परिवार आहे. यातील चारही मुलींची लग्ने झाली आहेत. सारे काही सुरळीत सुरू असतानाच २०१४ मध्ये अपघातात त्यांना एक पाय गमवावा लागला.

Sheikh Mastan Sheikh Roshan
Success Story: शेती,पर्यावरणाला दिशा देणाऱ्या योगेश्वरी चौधरी

याच दरम्यान लक्ष्मण माहुरे (रा. हिवळणी) हे वाकोडीच्या मंदिरात व्यवस्थापनाचे काम करायचे. परंतु काही कारणास्तव त्यांनी हे मंदिर सोडून महादेव मंदिराच्या उभारणीसाठी जागेच्या शोधार्थ भटकंती सुरू केली.

त्या वेळी शेख मस्तान यांच्या नदीकाठावरील जागेबाबत त्यांना कळाले. त्या वेळी ही जागा विकत द्यावी, अशी गळ श्री. माहुरे यांनी शेख मस्तान यांना घातली. परंतु जागा विकत देण्याऐवजी या सामाजिक कार्यासाठी दान देतो, असे त्यांनी सांगितले. क्षणभर माहुरे यांना विश्‍वासच बसला नाही. मात्र अवघ्या काही दिवसांतच कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करीत २०१७ मध्ये मंदिराच्या नावे जागेचे हस्तांतरदेखील शेख मस्तान यांनी केले.

Sheikh Mastan Sheikh Roshan
Land Record: समजून घ्या गाव नमुना

विरोध पत्करून दान

‘‘समाजातून विरोध झाला, परंतु ही वडिलोपार्जित जमीन असून त्यावर माझ्या कुटुंबीयांचा अधिकार आहे. या जमिनीचे काय करायचे याचा निर्णय मीच घेणार, असे सुनावले आणि जमीन मंदिराकरिता दान केली,’’ असे शेख मस्तान यांनी सांगितले.

मानवी जन्म कोणत्या धर्मात किंवा जातीत घ्यावा हे आपल्या हातात नाही. निदान माणूस म्हणून जगणे तरी आपल्या हातात आहे. हे काम प्रामाणिकपणे प्रत्येकाने करावे. हीच आमची प्रार्थना अन् हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हा विचार रुजला पाहिजे.
शेख मस्तान शेख रोशन, ९५७९९ १६६४०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com