Jal Jeevan Mission : पाण्यासारखा पैसा खर्चूनही ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

Water Crisis : खटकाली हे अमरावती जिल्ह्याच्या हद्दीतील शेवटचे व व्याघ्रप्रकल्पात वसलेले छोटेसे आदिवासीबहुल गाव. गावाची लोकसंख्या ५०० च्या आसपास. पण गावात सुविधांची बोंब आहे.
Water Crisis
Water CrisisAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : चिखलदरा तालुक्यातील अतिशय घनदाट व्याघ्रप्रकल्पात वसलेल्या खटकाली गावात जलजीवन मिशनवर लाखोंची उधळपट्टी करण्यात आली. मात्र त्यानंतर देखील या ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरूच आहे. योजनेवरचा सारा निधी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या घशात गेल्याने केवळ त्यांचीच तृप्ती होऊ शकली असा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.

खटकाली हे अमरावती जिल्ह्याच्या हद्दीतील शेवटचे व व्याघ्रप्रकल्पात वसलेले छोटेसे आदिवासीबहुल गाव. गावाची लोकसंख्या ५०० च्या आसपास. पण गावात सुविधांची बोंब आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जलजीवन मिशन अंतर्गत येथे करोडो रुपयांची योजना आखली. नवीन विहीर, पाइपलाइन, पाण्याची टाकी बांधण्यात आली, पण या गावात मागील वीस वर्षांतही गावकऱ्यांनी ‘नल से जल’ कधी पाहिलेच नाही.

Water Crisis
Solapur Water Crisis : पावसाळ्याला सुरुवात; अजूनही १९ टँकर सुरू

त्यामुळे गावकऱ्यांना आजही दररोज सकाळी व संध्याकाळी गावाबाहेर असलेल्या एका लहानशा ३० फूट खोल विहिरीतून बादलीने पाणी ओढावे लागते. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने राबविलेली जलजीवन मिशन योजना गावकऱ्यांसाठी की अधिकारी व कंत्राटदारांसाठी, असा प्रश्न गावकरी करीत आहेत.

मेळघाटातील बऱ्याच गावात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने नवीन विहिरी, जलवाहिनी व पाण्याच्या टाक्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत बांधून ठेवल्या आहेत. त्यापैकी ५० टक्के गावात या-ना त्या कारणांनी पाणीपुरवठा बंद आहे. आता गावात बांधलेल्या टाक्या फक्त शोभेच्या वास्तू म्हणून उभ्या आहेत.

Water Crisis
Palghar Water Crisis : पालघर जिल्ह्याचा पाणीप्रश्न पेटणार

त्यामुळे शासनाची महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजना मेळघाटात अधिकारी व कंत्राटदारांमुळेच फेल झाल्याचे चित्र अनेक गावांत आहे.

पाणीपुरवठाच्या नावावर दरवर्षी दुरुस्ती

पाण्याच्या टाकीतून जलवाहिनीद्वारे घरापर्यंत पाणी पोहोचले पाहिजे म्हणून विहिरीचे खोदकाम व जलवाहिनी दुरुस्तीच्या नावावर दरवर्षी बिले बनवून काढली जातात. पण प्रत्यक्ष गाव मात्र तहानलेलेच आहे. बाराही महिने या विहिरीतूनच पाणी ओढून भरल्या जाते, असे खटकाली गावातील दीपक टेकाम, रामेश्वर माळवे, राजा खराबे, गजानन खराबे यांनी सांगितले.

जलवाहिनीचे काम निकृष्ट

खटकाली गावातील विहिरीपासून टाकीपर्यंतचे अंतर जवळपास ५०० मीटर आहे. जलजीवन मिशन योजनेतून जलवाहिनीचे काम करण्यात आले. त्याकरिता फक्त एक ते अर्धा फूट नाली खोदून त्यात जलवाहिनी टाकण्यात आली व ती नाली कशीबशी बुजविण्यात आली. त्यातही निकृष्ट दर्जाचे पाइप टाकण्यात आल्याने पाणी टाकीपर्यंत पोहोचलेच नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com