Land Record: समजून घ्या गाव नमुना

Register of Lands: गाव नमुना एक मध्ये गावातील सर्व जमिनीची माहिती यात नोंद असते. म्हणून याला जमिनींची नोंदवही म्हणून संबोधण्यात येते. गावातल्या प्रत्येक शेताची वेगवेगळी आवश्यक माहिती या नमुन्यात स्वतंत्रपणे दाखविण्यात येते, म्हणून या नमुन्याला शेतवार पत्रक म्हणण्याचीही प्रथा आहे.
Gaon Namuna
Gaon NamunaAgrowon
Published on
Updated on

Village Form Document: गाव नमुना सातबारा कसा तयार होतो, त्याचे मूळ स्रोत काय आहे हे माहिती असणे आवश्यक आहे. सातबाराचे मूळ स्रोत आकार बंद हे आहे. आपणास ज्यावेळेस सातबाराच्या क्षेत्राविषयी किंवा मालकी हक्काविषयी प्रश्‍न निर्माण होतो, तेव्हा हाच गाव नमुना पुरावा म्हणून पाहिला जातो. त्यामुळे शेतकऱ्याच्या दृष्टीने हा नमुना अतिशय महत्त्वाचा आहे.

जमिनीसंदर्भात महत्त्वाची कागदपत्रे

जमाबंदीच्या वेळी प्रत्येक गावासाठी अभिलेख तयार करण्यात येतात. सदरील अभिलेख खालीलप्रमाणे असतात.

आकारबंद पुस्तक : या पत्रकावरून गाव नमुना एक तयार करण्यात येतो.

गाव नकाशा.

गट बुक.

गाव नमुना एक

गावच्या सर्व जमिनीची माहिती यात नोंद असते. म्हणून याला जमिनींची नोंदवही म्हणून संबोधण्यात येते. गावातल्या प्रत्येक शेताची वेगवेगळी आवश्यक माहिती या नमुन्यात स्वतंत्रपणे दाखविण्यात येते, म्हणून या नमुन्याला शेतवार पत्रक म्हणण्याचीही प्रथा आहे.

प्रत्येक जमिनीच्या प्रतीनुसार (सुपीकता) या नमुन्यात आकार दाखविलेला असतो, त्यामुळे त्यास आकारबंद म्हणतात, तसेच वार्षिक जमाबंदी या नमुन्यातील प्रत्येक क्षेत्राच्या आपण आकाराच्या आधारे पार पाडण्यात येत असल्याने जमाबंदी मिस्ल असेही या नमुन्याला संबोधले जाते.

Gaon Namuna
Land Fragmentation Act: शहरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची महसूल मंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

जमाबंदीच्या वेळी गावातील प्रत्येक शेताचा भूमापन क्रमांक म्हणजे सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, जमीन धारणा पद्धती, लागवडीस योग्य असलेली जमीन, वर्गवारीनुसार बागायत, भातजमीन, जिरायती, वरकस, शिदाड क्षेत्र आणि आकारणी; तसेच सार्वजनिक मार्गाधिकार दाखविणारे एक पत्रक तयार करण्यात येते. हे सूड पत्रक म्हणून ओळखले जाते. जमाबंदीच्या वेळी तयार केलेले हे सूड पत्रक वर नमूद केल्याप्रमाणे जमीन मोजणी खात्याकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तलाठ्याकडे पाठविण्यात येते. या सूड पत्रकावरून तलाठी गाव नमुना एक तयार करतात आणि सूड पत्रक मोजणी खात्याकडे परत केले जाते.

गावी असलेल्या प्रत्येक शेताची मूलभूत माहिती गाव नमुना एकमध्ये दिलेली असते.

स्तंभ १ : यामध्ये प्रत्येक जमिनीचा भूमापन क्रमांक/गट क्रमांक लिहिलेला असतो; तसेच त्या भूमापन क्रमांकात काही भूमापन, उपविभाग (हिस्से, पोटहिस्से) असतील तर ते नोंदवलेले असतात.

स्तंभ २ : यामध्ये जमिनीचा धारणा प्रकार दाखविलेला असतो. जमीन भोगवटदार वर्ग एकची किंवा भोगवटदार वर्ग दोन किंवा मोफत कुरणाची किंवा वनजमीन किवा दुमाला म्हणजे देवस्थान किंवा बिनभोगवट्याची आहे हे नोंदवलेले असते. हा नमुना प्राधान्यतः गावठाणाबाहेरील शेतजमिनीचा आहे. त्यामध्ये जमिनीची कृषी आकारणी स्तंभ ७ मध्ये दर्शविलेली असते.

स्तंभ ३ : प्रत्येक जमिनीच्या एकूण क्षेत्रामध्ये लागवडीस अयोग्य बिनआकारी म्हणजे पोटखराब किंवा लागवडीस उपलब्ध नसलेले क्षेत्र किती आहे याची नोंद असते.

स्तंभ ४ : यामध्ये जमीन लागवडीचा प्रकार नोंद असतो.

स्तंभ ५ : लागवडीस अयोग्य क्षेत्र किंवा अनुपलब्ध क्षेत्राची नोंद असते.

स्तंभ ६ : स्तंभ ३ मधील प्रत्येक जमिनीच्या एकूण क्षेत्रातून स्तंभ ४ व ५ मध्ये नोंदलेले लागवडीस अयोग्य की अनुपलब्ध क्षेत्र वजा करून राहिलेले निव्वळ लागवडीस योग्य असलेले क्षेत्र स्तंभ ६ मध्ये नोंदलेले असते.

स्तंभ ७ : यामध्ये जमीन क्षेत्रावरील कृषी आकारणीची माहिती असते.

स्तंभ ८ : प्रत्येक जमिनीत काही सार्वजनिक मार्गाधिकार आणि सुविधाधिकार असल्यास त्याची माहिती यामध्ये नोंद असतात.

गावी कोणतेही कृषी क्षेत्र जेव्हा अकृषिक वापराखाली येते तेव्हा त्याची मोजणी-खात्याकडून मोजणी केली जाते. त्या खात्याकडून कमी-जास्त पत्रक आल्यानंतर हे अकृषी क्षेत्र निव्वळ लागवडीस योग्य या स्तंभ ६ मधून कमी करून लागवडीस अनुपलब्ध म्हणून स्तंभ (४) व (५) मध्ये दाखविण्यात येते.

Gaon Namuna
Land Circular: भोगवटादार वर्ग-२ जमिनींसाठी परिपत्रक

गावातील सर्व भूमापन क्रमांक आणि असल्यास त्यातील उपविभागांची माहिती या नमुन्यात दाखविल्यानंतर शेवटी गावठाणाबाहेरील जमिनीची एकूण बेरीज केलेली असते. या क्षेत्रामध्ये गावाच्या हद्दीतील गावठाण, नद्या, नाले, रस्ते वगैरे खालील क्षेत्र जे बीन मोजलेले असते ते स्वतंत्र दाखवलेले असते आणि शेवटी गावाची एकूण एकंदर क्षेत्राची आणि आकाराची बेरीज केलेली असते. गावाची वार्षिक जमाबंदी या नमुन्याच्या आधारे केली जाते.

कमी-जास्त पत्रक

शेत जमिनीच्या खरेदी-विक्री, बक्षीस किंवा इतर मार्गाने जमिनी सतत हस्तांतरित होत असल्याने शेत जमिनीच्या गाव नमुना एकमध्ये वारंवार बदल होत असतात. कृषी जमिनीचा वापर अकृषी प्रयोजनासाठी होतो. शेतजमीन विविध प्रकल्पांसाठी संपादन केली जाते, भूमापन क्रमांकात त्याच्या क्षेत्रात फेरफार होतो.

नवीन भूमापन क्रमांक किंवा त्याचे उपविभाग (हिस्से-पोटहिस्से) तयार होतात. भोगवटदार वर्ग बदलतो, असा झालेला कोणताही बदल जिल्हा निरीक्षक भूमी अभिलेख यांना कळवून त्यानंतर त्यांच्याकडील अभिलेख दुरुस्त करून एक गोषवारा व रेखाचित्र नकाशा जोडून कमी-जास्त पत्रक नावाचे भूमापन दुरुस्ती विवरण पत्र काढतील. कमी-जास्त पत्रक मोजणी खात्याकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तलाठी यांच्याकडे आल्यावर या फेरबदलाची नोंद स्तंभ ९ व १० मध्ये रीतसर ठेवण्यात येते. थोडक्यात, मोजणी खात्याकडून कमी-जास्त पत्रक तलाठी यांचेकडे येईपर्यंत गाव नमुना एकमध्ये कोणताही फेरबदल करता येत नाही.

कारण मोजणी खात्याकडील अभिलेख आणि गावाचा अभिलेख मिळता-जुळता ठेवणे अत्यावश्यक असते.

या कमी-जास्त पत्रकामध्ये साधारणतः हस्तलिखित चुकांची दुरुस्ती, बिनआकारी बिनभोगवट्याच्या जमिनीचे प्रदान, आकारी किंवा बिनआकारी बिनभोगवट्याच्या जमिनीचे अभिहस्तांकन, अकृषिक परवानगी देणे, अन्य अधिकृत अकृषिक वापर नियमानुकूल करणे,मलई जमीन, पाण्यांनी वाहून गेलेली म्हणजे धुपलेली जमीन,धारणा प्रकारात बदल होणे. विविध प्रकल्पांसाठी जमीन संपादन होणे ई.ची नोंद असते.

गाव नमुना एक मधील मुख्य तपशील

मूळ जमाबंदी वर्ष, नंतरच्या पुनरिक्षण जमाबंदीचे किंवा जमाबंदीचे वर्षे.

पुढील जमाबंदी केव्हा व्हावयाची ते वर्ष.

जमिनीच्या निरनिराळ्या वर्गाकरिता प्रमाण दर.

गावाच्या ज्या गटामध्ये समावेश करण्यात आला तो जमाबंदी अहवालाचा गर म्हणजे सर्व्हेक्षण गट आणि

जमीन महसूल हप्त्याचा दिनांक.

गाव नमुना एकचा गोषवारा

गावच्या जमीन अभिलेखात गाव नमुना एकच्या अभिलेखला महत्त्वाचे स्थान आहे. कारण या गोषवाऱ्यावर गावचा ठरावबंद (गाव नमुना पाच) आणि तालुका व जिल्हा नमुने अवलंबून असतात. गाव नमुना एकच्या गोषवाऱ्यांत ‘अ’ भागात लागवडीकरिता असलेली जमीन आकारी आणि बिनआकारी स्वतंत्रपणे दाखविलेली असते.

‘ब’ भागात लागवडीस अनुपलब्ध जमीन लागवडीस अयोग्य, सार्वजनिक किंवा विशेष वापरासाठी नेमून दिलेली जमीन आणि अकृषिक वापरासाठी किंवा पट्ट्याने दिलेली किंवा प्रदान केलेली किंवा दुमाला म्हणजे इनाम जमिनीसह दाखविलेली असते. गाव नमुना एकच्या गोषवाऱ्यावरून गावच्या जमिनीची ताळेबंद माहिती एका क्षणात मिळू शकते.

गाव नमुना एक वरून गावी एकूण जमीन किती? त्यापैकी लागवडीस योग्य, लागवडीस अयोग्य, पडीक, अकृषिक जमीन किती आहे? हे जसे समजून येते त्याचप्रमाणे विविध सार्वजनिक किंवा विशेष वापरासाठी नेमून दिलेल्या जमिनीची माहिती एका दृष्टिक्षेपात मिळते. तेव्हा गावच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीचा आणि बदलांचा गोषवाऱ्यावरून पटकन सर्वसाधारण अंदाज करता येतो.

bvberule@gmail.com

(लेखक उमरगा, जि. धाराशिव येथे नायब तहसीलदार आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com