Ladki Bahin Scheme
Ladki Bahin Scheme Agrowon

Ladki Bahin Scheme : खुशखबर! लाडकी बहिणीचा हप्ता २६ जानेवारीला जमा होणार; अर्थ विभागाकडून निधी मंजूर

लाडक्या बहिणीची योजनेचा जानेवारीचा हप्ता २६ जानेवारीच्या आधी जमा होईल, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी गुरुवारी (ता.१६) दिली आहे.
Published on

Ladki Bahin: लाडक्या बहिणीची योजनेचा जानेवारीचा हप्ता २६ जानेवारीच्या आधी जमा होईल, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी गुरुवारी (ता.१६) दिली आहे. डिसेंबरचा हप्ता जमा झाल्यानंतर आता जानेवारी हप्ता कधी जमा होणार, याकडे लाडक्या बहिणीचं लक्ष लागलेलं होतं. परंतु जानेवारी हप्ता २१०० रुपयांचा नसून १५०० रुपयांचा असेल हे स्पष्ट झालं आहे., कारण त्यावरही अर्थसंकल्पानंतर निर्णय घेतला जाईल, असं मंत्री तटकरे यांनी सांगितलं आहे.

मंत्री तटकरे म्हणाल्या, "लाडकी बहिणीच्या जानेवारीचा हप्ता वितरणास २६ जानेवारीच्या आधी सुरूवात होईल. तर दोन ते तीन दिवसांत वितरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. अर्थविभागाकडून त्यासाठीची निधीदेखील आमच्या विभागाकडे आलेला आहे." असं तटकरे यांनी सांगितलं. डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिण योजनेचा राज्य सरकारने २ कोटी ४७ लाख महिलांना लाभ दिला आहे.

Ladki Bahin Scheme
Ladki Bahin Scheme : लाडकी बहीण योजनेचा तिजोरीवर अतिरिक्त भार नाही; राज्य सरकारचं नागपूर खंडपीठासमोर स्पष्टीकरण

डिसेंबर महिन्यातील लाडक्या बहिणीचा हप्ता २५ ते ३० तारखेच्या दरम्यान वितरित करण्यात आला होता. तर जानेवारीचा हप्ता संक्रांतीपर्यंत जमा होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. तसेच जानेवारीपासून २१०० रुपये हप्ता दिला जाईल, असंही बोललं जात होतं. परंतु आता जानेवारी हप्ता २६ जानेवारीच्या आधी जमा होणार असून तो १५०० रुपयांचा असेल याबद्दल मंत्री तटकरे यांनी माहिती दिली आहे.

यापूर्वी देखील २१०० रुपयांच्या वचनाबद्दल राज्य सरकारकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं होतं. याबद्दल मंत्री तटकरे म्हणाल्या, "निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. अर्थसंकल्पानंतरच त्याबद्दल निर्णय घेतला जाईल. जानेवारीचा हप्ता करण्यासाठी एकूण ३ हजार ९०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे." असंही तटकरे म्हणाल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com