Mumbai Train Blast Case : २००६ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा निर्णय : ११ आरोपींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

Mumbai High Court Decision: २००६ मध्ये मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात तब्बल १९ वर्षांनंतर मोठा निकाल समोर आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ११ दोषींना आज निर्दोष घोषित केले आहे.
Mumbai Train Blast Verdict
Mumbai Train Blast VerdictAgrowon
Published on
Updated on

Pune News: मुंबईमध्ये १ जुलै २००६ रोजी लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात तब्बल १९ वर्षांनंतर मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील ११ दोषींना आज (ता. २१) पुराव्याअभावी आणि साक्षीदारांच्या अविश्वसनीय जबाबांमुळे निर्दोष मुक्त केले आहे.

१ जुलै च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटात ७ लोकल गाड्यांमध्ये अवघ्या ११ मिनिटांमध्ये स्फोट झाले होते. या हल्ल्यात २०९ प्रवाशांचा मृत्यू झाला आणि ८२७ हून अधिक लोकं जखमी झाले होते. त्यामुळे देशभरात भीतीचं वातावरण पसरले होते. या हल्ल्याच्या तपासात एटीएसने १३ जणांना अटक केली होती. त्यानंतर यातील १५ जण फरार असल्याचे सांगितले होते. तर काहीजण पाकिस्तानात असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला होता.

Mumbai Train Blast Verdict
Manikrao Kokate Controversy: कृषिमंत्री कोकाटे आणि वाद; ओसाड गावच्या पाटीलकीपासून रमीपर्यंत

तपास यंत्रणेनं या प्रकरणात MCOCA आणि UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर नोव्हेंबर २००६ मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. तर २०१५ मध्ये ट्रायल कोर्टाने १२ आरोपींना दोषी ठरवले हाेते. त्यात ५ जणांना फाशीची शिक्षा तर ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्याच वेळी राज्य सरकारनेही फाशीची शिक्षा कायम राहावी यासाठी याचिकाही दाखल केली होती.

२०१९ ते २०२३ या काळात अपील सुनावणी विविध कारणांमुळे रखडली होती. प्रकरणातील पुरावे मोठ्या प्रमाणावर होते आणि तांत्रिक बाबीही अत्यंत गुंतागुंतीच्या होत्या. नंतर, दोषी ठरवण्यात आलेल्या एहतेशाम सिद्दीकीने अपीलची जलद सुनावणी व्हावी यासाठी अर्ज केला. त्यानंतर जुलै २०२४ पासून सहा महिने नियमित सुनावणी सुरू झाली.

Mumbai Train Blast Verdict
NABARD Award : अकोला-वाशीम जिल्हा बँकेला ‘नाबार्ड’चा ‘उत्कृष्ट जिल्हा बँक’ पुरस्कार

या सुनावणीदरम्यान,आरोपींनी पोलिसांनी जबरदस्तीने त्यांच्याकडून गुन्हा कबूल करून घेतल्याचा आरोप केला. त्यामुळे त्यांच्या जबाबांना विश्वासार्हता नाही, असे बचाव पक्षाने न्यायालयात सांगितले. तपासादरम्यान ‘इंडियन मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेचा संशयही व्यक्त करण्यात आला होता. तसेच, एक आरोपी सादिकने गुन्हा कबूल केल्याचाही उल्लेख करण्यात आला.

संपूर्ण प्रकरणाचे बारकाईने परीक्षण केल्यानंतर सर्व बाजूंनी विचार करून, पुराव्यांचा अभाव आणि साक्षीदारांच्या जबाबांमध्ये विसंगती असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने आता या ११ आरोपींना निर्दोष घोषित केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com