Kolhapur Weather : कोल्हापूर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने शेती पिकांचं नुकसान

Kolhapur Crop Damage : कोल्हापूर जिल्ह्याला सलग २ दिवस अवकाळी पावसाने झोडपून काढले. बुधवारी (ता.२३) रात्री अचानक झालेल्या पावसाने शिरोळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये शाळू पिकाचे मोठे नुकसान झाले.
Kolhapur Weather
Kolhapur Weatheragrowon
Published on
Updated on

Weather Update Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्याला सलग २ दिवस अवकाळी पावसाने झोडपून काढले. बुधवारी (ता.२३) रात्री अचानक झालेल्या पावसाने शिरोळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये शाळू पिकाचे मोठे नुकसान झाले. कापून ठेवलेला शाळू भिजल्याने बुरशी लागून काळा पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी कापणीला आलेले शाळू पीक जमीनदोस्त झाले आहे. तर काही ठिकाणी जनावरांचे गोठे, घरांची पडझड झाली आहे. दरम्यान झालेल्या नुकसानीची पाहणी करून कृषी विभागाकडून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

अवकाळीच्या पावसाने विविध तालुक्यांमध्ये कोट्यवधींचे नुकसान झाले. शिरोळ तालुक्यातील अनेक गावातील पिके आडवी झाली. तर करवीर, चंदगड, हातकणंगले, गडहिंग्लज, आजरा, भुदरगड या तालुक्यांमध्ये घरे, गोठ्यांची पडझड झाली. यावेळी विजेचे खांब आणि झाडे पडल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम जिल्हा प्रशासनातर्फे सुरू झाले आहे.

Kolhapur Weather
Kolhapur Sangli Rain : कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला वादळी पावसाने नुकसान; सूर्यफूल शेतीचे नुकसान

चंदगड तालुक्यात काजूला फटका

शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांत शेतीचे नुकसानही मोठे झाले आहे. चंदगड आणि आजरा परिसरात आंबा आणि काजू झाडांचे नुकसान झाले असून, झाडाना फळे लागल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. सोसाट्याचा वारा सुटल्याने काही ठिकाणी शेतातील उभे पीक आडवे झाले. नेमके नुकसान किती झाले, याची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.

महावितरण कडून मिळालेल्या माहितीनुसार, विजेचे १८३ खांब पडले. ९ ठिकाणचे 'डीपी' नादुरुस्त झाले. शंभरांहून अधिक वृक्ष पडले. बालिंगा आणि शिंगणापूर परिसरात घराचे पत्रे उडून जाणे, गोठ्यांची पडझड होणे अशा घटना घडल्या आहेत. तर शिरोळ तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी शाळू पिकाची कापणी केली आहे. खुडणी करण्याआधीच पाऊस पडल्याने काढलेला शाळू पूर्णपणे भिजला आहे.

महावितरणचे ४६ लाखांचे नुकसान

अवकाळी पावसाने एकूण नुकसान किती झाले याची आकडेवारी संकलित करण्याचे काम आपत्ती व्यवस्थापन विभाग करत आहेत. दरम्यान कोल्हापूर शहरात ४० पेक्षा जास्त झाडे उन्मळून पडली. महावितरणचे सुमारे ४६ लाख ९७ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com