Kharif Contest: ‘तिफन’तर्फे खरीप हंगामासाठी ‘माझा शेती संकल्प स्पर्धा’

Majha Sheti Sankalp: तिफन फाउंडेशनने खरीप हंगामासाठी ‘माझा शेती संकल्प स्पर्धा २०२५’ सुरु केली असून, राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी ही संधी मोफत आहे. स्पर्धेचा उद्देश शाश्वत व वैज्ञानिक शेती संकल्पांची अंमलबजावणी आणि ज्ञानाची देवाणघेवाण घडवून आणणे आहे.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon
Published on
Updated on

Pune News: खरीप हंगामासाठी तिफन फाउंडेशनतर्फे आयोजित ‘माझा शेती संकल्प स्पर्धा २०२५’ या अभिनव उपक्रमाचे उद्‌घाटन कृषी आयुक्त सूरज पांढरे यांच्या हस्ते नुकतेच झाले.

कार्यक्रमास कृषी निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक सुनील बोरकर, कृषी विस्तार व प्रशिक्षण संचालक रफिक नायकवडी, कृषी संचालक आत्मा अशोक किरनळ्ळी, फलोत्पादन कृषी संचालक कैलास मोते आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना आयुक्त श्री. पांढरे म्हणाले, “शेतकऱ्यांपर्यंत कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी विविध माध्यमांचा वापर होणे गरजेचे आहे. ही स्पर्धा त्यासाठी प्रभावी ठरेल. योग्य, व्यवहार्य आणि चुकीच्या शेती संकल्पांबद्दल स्पष्ट माहिती देण्यात यावी.”

Indian Agriculture
Groundwater Rich Village Contest : पुणे जिल्ह्यात होणार भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा

फाउंडेशन सातत्याने विविध प्रकारचे उपक्रम राबवीत असते. या स्पर्धेची माहिती देताना फाउंडेशनचे सुखदेव जमधडे म्हणाले, “माती परीक्षण, बीज प्रक्रिया, चांगल्या वाणांची निवड, बायोचार निर्मिती व वापर, कंपोस्टिंग व सेंद्रिय खतनिर्मिती या विषयांवर शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, परस्पर शिकण्याची संस्कृती वाढवणे हेच या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी खुली असून नोंदणी पूर्णतः मोफत आहे.”

नोंदणीसाठी ग्रामसेतू या अ‍ॅपचा वापर करावा लागेल. शेतकऱ्यांना स्पर्धेतील वेगवेगळ्या टप्प्यानुसार गुण मिळणार आहेत. शेतकऱ्यांची क्षेत्रीय पाहणी करण्यात येणार आहे. स्पर्धा यशस्वितेसाठी अंजना सोनवलकर, नीलेश बिबवे, महेश बोरुडे, दत्तात्रेय बुचकुल, प्रदीप भोर, राजेंद्र कदम, श्रीधर बेलसरे, संतोष पाटील, यशवंत गव्हाणे, भुजंग लोकरे, मनोज गायधने, रामहारी फटांगरे हे प्रयत्नशील होते.

Indian Agriculture
Rabi Crop Competition : रब्बी पिकांसाठी राज्यांतर्गत पीक स्पर्धा

स्पर्धेची माहिती :

कालावधी : १८ एप्रिल २०२५ ते १५ जून २०२५

निकाल जाहीर होण्याची तारीख: १५ जुलै २०२५

सादरीकरण : ऑनलाइन (ग्रामसेतू ॲप)

पोस्ट प्रकार : संकल्प + प्रत्यक्ष कृती (फोटो, व्हिडिओ, मजकूर)

विजेते प्रकार : या स्पर्धेत राज्य व जिल्हास्तरावर तीन अनुक्रमे विजेते निवडले जाणार आहेत. मोठ्या क्षेत्रफळाच्या जिल्ह्यांमध्ये प्रथम तीन क्रमांकाचे प्रत्येकी २ विजेते निवडले जातील.

राज्यस्तरीय पारितोषिके :

प्रथम : १० हजार रुपये

द्वितीय : ७ हजार रुपये

तृतीय : ५ हजार रुपये

जिल्हास्तरीय विजेत्यांना : सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com