Acquaculture Technology: मत्स्यपालनातील प्रेरित प्रजनन तंत्रज्ञान

National Fish Farmers Day: प्रेरित प्रजनन तंत्रज्ञानामुळे माशांच्या प्रजनन प्रक्रियेला कृत्रिमरीत्या गती देणे शक्य झाले. यामुळे माशांचे बीज मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत. या तंत्रज्ञानामुळे मत्स्यशेती अधिक व्यवहार्य आणि फायदेशीर बनली आहे.
Fish Farming
Fish FarmingAgrowon
Published on
Updated on

किरण वाघमारे

Induced Breeding Fish Farming: भारतात दरवर्षी १० जुलै रोजी राष्ट्रीय मत्स्यशेतकरी दिन साजरा केला जातो. हा दिवस मत्स्यशेती क्षेत्रातील शेतकऱ्यांचे योगदान आणि त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित आहे. राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन हा डॉ. हिरालाल चौधरी आणि डॉ. आलीकुन्ही यांच्या कार्याला सन्मान देण्यासाठी साजरा केला जातो. या शास्त्रज्ञांनी १० जुलै १९५७ रोजी प्रेरित प्रजनन तंत्रज्ञान विकसित करून मत्स्य शेती क्षेत्रात क्रांती घडवली. या तंत्रज्ञानामुळे मत्स्यबीज उत्पादनाची समस्या सुटली आणि भारतात भूजलाशयीन मत्स्योत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. या यशामुळे डॉ. हिरालाल चौधरी यांना ‘नीलक्रांतीचे जनक’ म्हणून ओळखले जाते.

देशाच्या अर्थव्यवस्थेत मत्स्यशेतीचा वाटा लक्षणीय आहे. भारताच्या एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या सुमारे १ टक्का आणि सकल राष्ट्रीय कृषी उत्पन्नाच्या ५ टक्के वाटा मत्स्योत्पादनाचा आहे. नीलक्रांती हा भारतातील मत्स्य शेतीच्या विकासाचा आणि उत्पादन वाढीचा कालखंड आहे. या क्रांतीने भारताला जागतिक स्तरावर मत्स्योत्पादनात अग्रणी देश बनवले. आज भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मत्स्योत्पादक देश आहे, आणि यामागे डॉ. चौधरी आणि डॉ. आलीकुन्ही यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

Fish Farming
Fish Farming : मत्स्यपालन करताना कोणत्या महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे

डॉ. हिरालाल चौधरी यांनी प्रेरित प्रजनन तंत्रज्ञान स्थानिक मत्स्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्थानिक मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले. त्यांनी सेंट्रल इनलँड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट येथे अनेक प्रयोग केले, ज्यामुळे मत्स्यशेती अधिक शास्त्रीय आणि व्यवहार्य बनली.त्यांच्या कार्यामुळे भारताला जागतिक स्तरावर मत्स्यशेतीत अग्रणी स्थान मिळाले.

भारतामध्ये २०१४-१५ ते २०१९-२० या कालावधीत मत्स्योत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. आज भारताचे वार्षिक मत्स्योत्पादन सुमारे १४ दशलक्ष टनांपेक्षा जास्त आहे. जलप्रदूषण, आर्थिक साह्याची कमतरता आणि बाजारपेठेतील अस्थिरताही मत्स्यशेती क्षेत्रासमोर काही आव्हाने आहेत. यावर उपाय म्हणून प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY)सारख्या सरकारी योजनांद्वारे आर्थिक साह्य, प्रशिक्षण आणि बाजारपेठ सुविधा पुरवल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून मत्स्योत्पादन २२ दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

प्रेरित प्रजनन तंत्रज्ञान

प्रेरित प्रजनन तंत्रज्ञानामुळे माशांच्या प्रजनन प्रक्रियेला कृत्रिमरीत्या गती देणे शक्य झाले. यामुळे माशांचे बीज मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागले, ज्यामुळे मत्स्यशेती अधिक व्यवहार्य आणि फायदेशीर बनली.

हे तंत्र प्रथम स्मॉल मड गोबी या माशाच्या प्रजातीवर यशस्वीपणे लागू करण्यात आले. यानंतर कार्प प्रजातीमध्ये याचा वापर वाढला. या माशांना जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे.

या तंत्रामुळे मत्स्यशेतकऱ्यांना वर्षभर माशांचे बीज उपलब्ध होऊ लागले, ज्यामुळे उत्पादनात सातत्य आणि स्थिरता आली.

Fish Farming
Fish Farming : मत्स्यव्यवसायाला मिळणार कृषीचा दर्जा

दिनाचे उद्दिष्ट

मत्स्यशेतकऱ्यांचा सन्मान : मत्स्यशेती क्षेत्रातील शेतकऱ्यांचे योगदान ओळखणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे.

जागरूकता वाढवणे: मत्स्यशेतीच्या महत्त्वाबाबत आणि त्यातून मिळणाऱ्या आर्थिक संधींबाबत जनजागृती करणे.

शाश्‍वत विकास : शाश्‍वत मत्स्यशेती पद्धतींना प्रोत्साहन देऊन पर्यावरण संतुलन राखणे.

तांत्रिक प्रगती : नवीन तंत्रज्ञान आणि संशोधन यांचा प्रसार करून मत्स्य शेतकऱ्यांना सक्षम करणे.

कार्यशाळा आणि प्रशिक्षण : मत्स्य शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान, नवीन पद्धती आणि बाजारपेठेतील संधी यांबाबत कार्यशाळांचे आयोजन केले जाते.

सन्मान समारंभ : उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मत्स्य शेतकऱ्यांचा आणि शास्त्रज्ञांचा सन्मान केला जातो.

जागरूकता कार्यक्रम : मत्स्य शेतीच्या फायद्यांबाबत स्थानिक समुदायांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले जातात.

प्रदर्शन : मत्स्य शेतीतील नवीन उपकरणे, तंत्रज्ञान आणि उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित केले जाते.

मत्स्य शेतीचे योगदान

आर्थिक योगदान : मत्स्य शेतीमुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. लाखो लोकांचा रोजगार यावर अवलंबून आहे.

पोषण सुरक्षा : मत्स्योत्पादनामुळे प्रथिनांचा पुरवठा वाढला आहे, ज्यामुळे कुपोषणाचा प्रश्‍न कमी करण्यात मदत झाली आहे.

निर्यात : भारतातून मोठ्या प्रमाणात मासे आणि मत्स्य उत्पादनांची निर्यात केली जाते, ज्यामुळे परकीय चलन मिळते.

- किरण वाघमारे ९८८१६००९५१

(सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com