Vice President Dhankhar: शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात अनुदान द्या; उपराष्ट्रपती धनखड यांची सूचना

Farmer Subsidy Reform: देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदान पद्धतीत बदल करण्याची सूचना केली आहे. जयपूर येथील कार्यक्रमात त्यांनी शेतकऱ्यांना मिळणारी मदत थेट त्यांच्या बँक खात्यात पाठवण्याचे महत्त्व सांगितले.
Vice President Jagdeep Dhankhar
Vice President Jagdeep DhankharAgrowon
Published on
Updated on

Pune News:  देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड पुन्हा एकदा शेतकऱ्यांना मिळत असलेल्या अनुदान पद्धतीत बदल करण्याची सूचना केली आहे. उपराष्ट्रपती धनखड यांनी सरकार शेतकऱ्यांना करत असलेल्या आर्थिक मदतीवर राजस्थान येथील जयपुरमध्ये सोमवारी (ता.३०) भाष्य केलं.

उपराष्ट्रपती धनखड म्हणाले, "शेतकऱ्यांना सर्व सरकारी अनुदान थेट त्यांच्या खात्यात दिले गेले पाहिजे, यात कोणताही मध्यस्थ किंवा शासकीय यंत्रणा त्यात असू नये. यामुळे शेतातील निर्णय शेतकरी स्वतः घेऊ शकतील, शेतीचे स्वरूप बदलण्यास मदत होईल,"

Vice President Jagdeep Dhankhar
Agriculture Budget: ‘कृषी’तर्फे सर्वांत कमी मागण्या

पुढे उपराष्ट्रपती धनखड यांनी अनुदानाच्या पद्धतीत बदल करण्याची भूमिका मांडली. “ सरकार प्रत्येक वर्षी खत अनुदानासाठी सुमारे ३ लाख कोटी रुपये खर्च करते. पण ह्या अनुदानाची  रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिली जात नाही, ही रक्कम जर थेट शेतकऱ्यांच्या  खात्यात गेली तर, शेतात कोणते खत वापरायचे, पशुधन घ्यायचे की नैसर्गिक शेती करायची, अशे वेगवेगळे निर्णय शेतकऱ्यांना स्वतःच  घेता येतील. यामुळे शेतात वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांचा वापर कमी होईल आणि सेंद्रिय शेतीच्या वाढीस चालना मिळेल." असंही उपराष्ट्रपती धनखड म्हणाले.

यावेळी उपराष्ट्रपती धनखड यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा उल्लेख केला. ते म्हणाले, या योजनेत शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात आणि एकूण सुमारे ६० हजार कोटी रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा होतात. मात्र, जर सर्व सरकारी अनुदान थेट शेतकऱ्यांना दिले गेले, तर प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी ३० हजार रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम मिळू शकते.

Vice President Jagdeep Dhankhar
Agriculture Commodity Market : राज्य सरकारकडून हेजिंग डेस्क स्थापनेची घोषणा

अमेरिकेतील थेट अनुदान पद्धतीचे उदाहरण देताना उपराष्ट्रपती धनखड यांनी सांगितले की, तेथे सरकार शेतकऱ्यांना अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात देते आणि यात कोणतीही शासकीय यंत्रणा हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे शेतकरी स्वतःचे निर्णय स्वतः घेतात आणि यामुळे त्यांच्या उत्पन्नातही वाढ होते. म्हणूनच आपल्या देशातही अनुदान पद्धतीत बदल करण्याची गरज असल्याचं उपराष्ट्रपती म्हणाले.

दरम्यान, जयपूरमधील या कार्यक्रमात बोलताना त्यांनी राजस्थानचं कौतुक केलं. राजस्थानची ओळख महाराणा प्रताप आणि महाराजा सूरजमल यांच्या शौर्यावर आधारित आहे. अलीकडील घटनांमुळे त्यांच्या पराक्रमाची पुन्हा आठवण झाल्याचं उपराष्ट्रपती धनखड म्हणाले. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताकडून करण्यात आलेल्या दहशतवादविरोधी अचूक कारवाईचेही त्यांनी कौतुक केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com