Ladki Bahin Yojana : नव्या सरकारमध्ये लाडकी बहीण योजनेवर बंधने! अर्ज छाननीवर आदिती तटकरे यांची महत्वाची माहिती

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana : राज्यात फडणवीस सरकार आले असून ज्या लाडक्या बहिणींच्या जीवावर सत्ता आली आहे. आता त्याच लाडक्या बहिणींसाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल केला जाणार आहे.
Aditi Tatkare
Aditi TatkareAgrowon
Published on
Updated on

Pune News : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनं मोठा विजय मिळवून दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत योजनेतून पडताळणीबाबत संकेत देत जे अर्ज निकशात बसत नाहीत ते बाद केले जातील असे म्हटले होते. यानंतर आता या योजनेच्या पडताळणीवरून जोरदार टीका होत आहे. दरम्यान राज्याच्या माजी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे २ कोटी ३४ लाख महिला लाभार्थी आहेत. याच लाडक्या बहिणींनी महायुतीला सत्तेवर येण्याचा मार्ग केला. पण अडीच लाखांपेक्षा अधीक वार्षिक उत्पादन असणाऱ्या तसेच घरात चारचाकी वाहन असणाऱ्या अनेक महिला योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारीवरून आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी केली जाणार आहे. तर जे अर्ज पाच निकषांच्या बाहेर असतील ते बाद केले जातील, अशी चर्चा सुरू झाल्या आहेत.

Aditi Tatkare
Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणी’वर १५ जानेवारीनंतरच देऊ उत्तर

यावरून आदिती तटकरे यांनी, मी महिला व बालविकास खात्याची मंत्री असताना योजना राबवत असताना काटेकोर नियमांचे पालन करण्यात आले आहे. अर्जांची प्राथमिक छाननी करूनच आधार सिडिंग करून लाभार्थी निवडले गेल्याचे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.

तर अर्जांची छाननी करण्यासाठी तक्रार यावी लागते. तशा तक्रारी आल्या आहेत की नाही, याची माहिती माझ्याकडे नाही. मी आता खात्याची मंत्री नाही. पण जर छाननी करण्याचा निर्णय झाला असेल तर तक्रारी आल्या असाव्यात आणि यावर निर्णयही विभागाचे अधिकारी घेतली.

Aditi Tatkare
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना २१०० रुपये एप्रिलपासून मिळण्याची शक्यता; सरकार अर्ज तपासून अपात्र महिलांना डच्चू देणार असल्याचीही चर्चा

आतापर्यंत आलेल्या अर्जांची अतिशय प्राथमिक छाननी करून आधार सिडिंग करून लाभार्थी निवडण्यात आले आहेत. आताही नव्या अर्जांची छाननी आधारावरच करावी लागणार आहे. पण अद्याप या योजनेच्या छाननीबाबत कोणताच निर्णय झालेल्या नाही, अशीही माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

दरम्यान निवडणुकीच्या निकालानंतर तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे सरकार लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळेच आल्याचे म्हटले होते. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार यांनी देखील लाडक्या बहिणींमुळे महायुती पुन्हा सत्तेत आल्याचे म्हटले होते.

Aditi Tatkare
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे याच महिन्यात मिळतील; मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन

तसेच फडणवीस यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत लाडकी बहिण योजनेवरून माहिती दिली होती. तसेच योजनेतील अर्जांच्या छाननीवरून माहिती देताना, राज्यातील महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरूच राहणार आहे. तर आम्ही दिलेल्या वचना प्रमाणे २१०० रूपये दिले जातील. पण आता या योजनेबाबत काही तक्रारी आल्या असून अर्जांची छाननी केली जाईल, असे म्हटले होते.

कोणते असतील निकष?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी आता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, चारचाकी वाहन, पाच एकरपेक्षा अधिक जमीन, एकच महिला लाभार्थी दुसरी कोणती शासकीय योजनेचा लाभ घेते का? एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक या योजनेत आहेत का? याचा शोध घेतला जाणार आहे.

राऊतांचा हल्लाबोल

राऊत यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने योजनेद्वारे बहि‍णींनी पैसे दिले. आता याच योजनेची पडताळणी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. पण आमचे या योजनेवर बारीक लक्ष असून ज्यांना पैसे दिले आहेत, त्यांचे पैसे काढून घेऊ नका. योजना कशासाठी सुरू केली. १५०० देऊन बहिणींची मते विकत घेतली. आता पडताळणीच्या नावाखाली महिलांना योजनेपासून वंचित ठेवू नका असा हल्लाबोल राऊत यांनी महायुती सरकारवर केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com