Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे याच महिन्यात मिळतील; मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 : राज्यातील महिलांना जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे १५०० रूपये मिळत आहेत. आतापर्यंत जुलै ते नोव्हेंबर महिन्यापर्यंतच पैसे देण्यात थेट बँक खात्यावर देण्यात आले आहेत.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
Mukhyamantri Majhi Ladki Bahin YojanaAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह इतर काही योजना थांबवण्यात आल्या आहेत. पण संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच दिले होते. तर आता डिसेंबरचे देखील पैसे याच महिन्यात महिलांच्या खात्यावर जमा होतील, असा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे. ते शनिवारी (ता.२) एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत होते. मात्र अशा अनेक महिला आहेत, ज्यांना अद्याप ही रक्कम मिळालेली नाही.

यावेळी शिंदे म्हणाले, राज्यात विधानसभा निवडणूका कधीही घोषित होण्याची शक्यता होती. यामुळे आचारसंहितेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे अडकण्याची शक्यता होती. याच शक्यतेमुळे आम्ही आधीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन महिन्याचे पैसे वितरीत केले आहेत. आतापर्यंत जुलै ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत साडेसात हजार रुपये पात्र महिलांना मिळाले आहेत.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेविरोधात याचिका करणाऱ्याला सुरक्षा पुरवा

आता विधानसभेची निवडणूक २० नोव्हेंबर रोजी होत असून २३ तारखेला निकाल लागेल. या निकालानंतर पात्र महिलांना डिसेंबर महिन्याचे दिले जातील. म्हणजेच नोव्हेंबर महिन्यातच योजनेचे पैसे जमा होतील, असे शिंदे यांनी सांगितले आहे.

तसेच यावेळी शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेताना जोरदार टीका केली आहे. शिंदे यांनी, आपण गरीब शेतकरी कुटुंबातून आलो असून सत्तेत आल्यास गरीब बहीण, आई, शेतकरी, भाऊ यांच्यासाठी काहीतरी करण्याचा पक्का विचार केला होता. सत्तेत आल्यावर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलून चर्चा केली आणि निर्णय घेतला.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : बँक कर्मचाऱ्यांनी उपसले लाडकी बहीण योजनेच्या विरोधात संपाच हत्यार; १६ नोव्हेंबर रोजी संपाची घोषणा

आम्ही राज्यात अनेक योजना लागू केल्या. पण विरोधकांच्या त्या गोष्टी पचत नसल्याचे दिसत आहे. त्यांचा पराभव होणार असल्यानेच ते आता या योजनांवर टीका करत आहेत. पण आमची नियत स्वच्छ असून आम्ही देणारे आहोत, घेणाऱ्यातले नाही, असा टोला विरोधकांना शिंदे यांनी लगावला आहे.

अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण

दरम्यान राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी २.५ कोटी पात्र महिलांचे अर्ज आले होते. तर यातील २ कोटी ४० लाख महिलांचे अर्ज मंजूर झाले असून सर्व महिलांच्या खात्यावर आतापर्यंत १५०० रूपये जमा करण्यात आले आहेत. ही योजना बंद होणारी नसून ती कायमस्वरुपी सुरू राहणार, असल्याचे आश्वासन अदिती तटकरे यांनी १९ ऑक्टोबर रोजी एक्सवर पोस्ट करत दिले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com