Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना २१०० रुपये एप्रिलपासून मिळण्याची शक्यता; सरकार अर्ज तपासून अपात्र महिलांना डच्चू देणार असल्याचीही चर्चा

Maharashtra Government Scheme : निवडणुका संपल्यानंतर लाडक्या बहिणी २१०० रुपये कधीपासून मिळणार याची वाट पाहत आहेत. सरकार मात्र कागदपत्रांची पडताळणी करून, निकष तपासून अपात्र लाडक्या बहिणींना डच्चू देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana Agrowon
Published on
Updated on

Pune News : निवडणुका संपल्यानंतर लाडक्या बहिणी २१०० रुपये कधीपासून मिळणार याची वाट पाहत आहेत. सरकार मात्र कागदपत्रांची पडताळणी करून, निकष तपासून अपात्र लाडक्या बहिणींना डच्चू देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. तसेच लाडक्या बहिणींना एप्रिलपासून २१०० रुपये देण्याचा निर्णय होऊ शकतो, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. 

अर्जांची पडताळणी करताना महिलेच्या कुटूंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा अधिक असताना अर्ज केला का? अर्ज केलेल्या महिलांचे पती आयकर भरतात का ? एकाच कुटूंबातील २ पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले का ? विधवा, निराधार, परितक्त्या योजनेचा लाभ घेत असतानाही अर्ज केले का ? याची पडताळणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या योजनेतून अनेक महिलांना डच्चू मिळण्याची भीती आहे. 

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण आणि राजकीय मांडणी

मग सरकारने आश्वासन दिलेले २१०० रुपये कधीपासून मिळू शकतात? तर लाडक्या बहिणींना २१०० रुपये राज्याचा निर्णय अर्थसंकल्पात घेतला जाऊ शकतो. काही ठिकाणी डिसेंबरपासूनच २१०० रुपये दिले जातील, अशी चर्चा आहे. तर सरकारच्या गोटात १ एप्रिलपासून रक्कम २१०० रुपये केली जाईल, अशी चर्चा आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना १ एप्रिलपासूनच २१०० रुपये मिळू शकतात, याची दाट शक्यता आहे. नविन सरकार स्थापन झाल्यानंतर याची घोषणा होऊ शकते. 

सरकारने निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. योजनेत सहभागी होण्यासाठी अटी आणि निकषही लावले. मात्र निवडणुका असल्याने अर्जांची पडताळणी न करता, कागदपत्रे न तपासता महिलांना पैसे दिले. कारण सरकारला लाडक्या बहिणींना नाराज करायचे नव्हते. जवळपास अडीच कोटी अर्ज आले होते. त्यापैकी २ कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले. सरसकट महिलांना पैसे देण्यात आले, असेही म्हणायला हरकत नाही.

Ladki Bahin Yojana
Ladki bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेबाबत महत्वपूर्ण निर्णय

पण आता सरकार लाडक्या बहिणींनी भरलेल्या अर्जांची पडताळणी करणार आहे, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. कारण जर सरसकट लाभ द्यायचा होत तर नियम आणि अटी का? लावल्या? असा प्रश्न आहे. लाडकी बहीण योजनेत अनेक अपात्र महिलांनाही लाभ मिळत असल्याची चर्चा प्रशानामध्ये आधीपासूनच आहे. सरकारने अर्ज भरून घेताना हमीपत्रही भरून घेतले आहे. त्यानुसार सरकार कागदपत्रांची पडताळी करू शकते.

त्यानुसार सरकार आता नियम आणि अटींची चाळण लावून पडताळणी करण्याची शक्यता आहे. त्यात 
१. महिलेच्या कुटूंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा अधिक आहे का ?
२. अर्ज केलेल्या महिलांचे पती आयकर भरतात का  ?
३. एकाच कुटूंबातील २ पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले का  ?
४. विधवा, निराधार, परितक्त्या योजनेचा लाभ घेत असतानाही अर्ज केले का  ?
याची पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे अनेक महिलांना या योजनेतून बाहेर काढले जाऊ शकते. म्हणजेच या महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. 

निवडणुकीची आचारसंहीता लागण्याआधी अनेक लाडक्या बहिणींना ५ महिन्याचे ७५०० रुपये देण्यात आले. तर काही लाडक्या बहिणींना ४५०० रुपये मिळाले. निवडणुकीत लाडक्या बहिणीचे पैसे १५०० हजारांवरून २१०० रुपये करू असे आश्वासन महायुतीने दिले. लाडक्या बहिण योजनेचा सरकारला मोठा फायदा झाला. लाडक्या बहिणीमुळे आम्ही पुन्हा सत्तेत आलो असे महायुतीचे नेते बोलून दाखवत आहेत. तसेच आम्ही आमचा शब्दही पाळू असे महायुतीच्या नेत्यांनी निवडणुका झाल्यावर लगेच स्पष्ट केले. पण जर सरकारने अर्जांची पडताळणी केली, कागदपत्रे तपासली तर अनेक महिला या योजनेतून बाहेर पडू शकतात. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com